अकलूज – संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधी साठी आयोजित केलेल्या वीसाव्या भव्य लेझीम स्पर्धेत मुलांबरोबरच मुलींनीही दिमाखदार सादरीकरण केले. खेळाडूंचा जोश व उत्साहा मुळे स्पर्धेत रंगत वाढली आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त विजय चौक, अकलूज येथे सदरच्या स्पर्धा सुरू आहेत.
सचिव संजय राऊत म्हणाले, ग्रामीण खेळ व कलेचे जतन व संवर्धन करणारे जयसिंह मोहिते पाटील, मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, कार्याध्यक्षा कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेत मुलींच्या खुल्या गटात-
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान महिला महाविद्यालय अकलूज यांनी प्रथम क्रमांक, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांनी द्वितीय क्रमांक, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील महिला वसतिगृह अकलूज आणि औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय (पदवी) अकलूज यांनी विभागून तृतीय क्रमांक पटकावला. शहरी मुले अ गटात- सदाशिवराव माने विद्यालय अकलूज यांनी प्रथम, महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर यांनी द्वितीय व मोरजाई विद्यालय मोरोची यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
शहरी मुले ब गटात- विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली यांनी प्रथम, श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर यांनी द्वितीय व कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
ग्रामीण मुली गटात –
श्री.विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय कोळेगाव प्रथम, श्री संत तुकाराम विद्यालय बोंडले द्वितीय,
सदाशिवराव माने विद्यालय माणकी तृतीय, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालय मांडवे चतुर्थ,
श्री गणेश विद्यालय पिंपळनेर
व श्रीनाथ विद्यालय, लोंढे-मोहितेवाडी यांनी विभागून पाचवा क्रमांक पटकावला.
विजेत्या संघांना जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, कार्याध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील,नगरसेवक चि. सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेत प्राथमिकचे ५ , मुलांचे ३१ व मुलींचे २२ असे एकूण ५८ संघांनी सहभाग घेतला आहे.
सुत्रसंचलन किरण सूर्यवंशी, शकील मुलाणी, ईलाई बागवान यांनी केले.
स्पर्धेसाठी सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

















