सोलापूर – येथील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात आयोजित डॉग शोला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.तब्बल तीनशेहून अधिक देशी-विदेशी श्वानांचा यामध्ये सहभाग होता.होम मैदान येथे श्री सिद्धेश्वर देवस्थानच्यावतीने दि.२५ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजित श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये तिसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोचे उद्घाटन देवस्थानचे विश्वस्त मल्लिनाथ मसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले तसेच स्मार्ट एक्सपोचे संचालक सोमनाथ शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी फॅन्सी डॉग शो तसेच फॅशन डॉग शो या स्पर्धाही घेण्यात आल्या. त्याचबरोबर आठ ते 16 वयोगटातील मुलामुलींसाठी ज्युनिअर हँडलिंग कॉम्पिटिशन स्पर्धाही पार पडली. या स्पर्धांना देखील भरभरून प्रतिसाद मिळाला.
या प्रदर्शनामध्ये पॉमेडियन,सायबेरियन हस्की, गोल्डन रेट्रीवर जर्मन शेफर्ड, लायब्रीडर, डॉबरमॅन, रॉटविलर,अमेरिकन गुली,ग्रेट डेन,डॉलमेशियन, सीझ्झू, लासाॲप्सो, केनकरसो, स्पॅनियल,बीगल, फ्रेंच गोल्डन,बुलडॉग, बॉक्सर,बेल्जियन मेलोनोईज,शायर टेरियर,पग आदी तसेच कॉरवॉन हाऊड, मुधोळ हाऊंड, पश्मी हाऊंड या देशी – विदेशी जातींच्या 24 प्रकारच्या श्वानांचा समावेश होता. विशेष म्हणजे सीझ्झू,जातीच्या जवळपास पंचवीस श्वानांचा यामध्ये विशेष सहभाग होता.डॉग शोमध्ये सहभागी या सर्व श्वानांच्या शरीराची ठेवण, डोळे, दात, उंची, केस, रंग, शेपटी, पायांची ठेवण या सर्व बाबींची परीक्षकांकडून तपासणी करण्यात आली.
या प्रदर्शनामध्ये सोलापूरसह, मिरज, सांगली, पंढरपूर,अकलूज,पुणे,लातूर,धाराशिव,बीड, परभणी तसेच कर्नाटकातील मुधोळ, विजापूर, बागलकोट आदी जिल्ह्यांतील श्वानप्रेमी आपल्या प्राणांसह श्वानांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात बेस्ट इंडियन ब्रीड,बेस्ट पपी इन शो, बेस्ट ज्युनिअर हँडलर, बेस्ट हँडलर यांची निवड करून त्यांना ट्रॉफी व रोख रक्कम तसेच डॉग फूड बॅगा देण्यात आल्या.
या स्पर्धेसाठी पेट्स वर्ल्ड अँड पेट गॅलरी सोलापूरचे आर्यन दळवी, स्वप्ना दळवी, शलवारी श्राफ, महेश माने, अभिजीत कम्पली यांच्यासह संगमेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून पुण्याचे संजय मु्थुर तर फॅशन डॉग शो व फॅन्सी डॉग शोचे परीक्षक म्हणून वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. सचिन देशमुख व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तृप्ती देशपांडे यांनी काम पाहिले.
यांचेही लाभले सहकार्य
ड्रल्स डॉग फूड कंपनी, कॉर्निव्हल डॉग फूड कंपनी, सिग्नेचर डॉग फुड कंपनी, बॉलर्स फूड कंपनी आदींचे या डॉग शो साठी सहकार्य लाभले. या कंपन्यांच्यावतीने स्पर्धेत सहभागी श्वानांना सॅम्पल डॉग फूड पॅकेट देण्यात आले.
कोट
आज कॅट शोचे आयोजन
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे होम मैदान मैदान येथे आयोजित ५५ व्या कृषी प्रदर्शनात उद्या (रविवारी ) २८ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत कॅट शोचे आयोजन करण्यात आले आहे.हे प्रदर्शन पाहण्यासाठी मांजर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

























