सोलापूर : विजापूर रोड सैफुल जवळील ए . जी.पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट येथे कार्यरत राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सोरेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर स्वच्छता अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या स्वच्छता अभियानास श्री गजानन महाराज मंदिर प्रशासनाद्वारे सहकार्य मिळाले.
मंदिर प्रशासनाद्वारे स्वच्छता अभियानात सहभागी व स्वच्छता अभियानाचे मुख्य समन्वयक श्री एस. एल. मुडगी, सौ. एस. आर. मिठ्ठा, श्री व्ही. जी. अंबीगार व श्री ए. आर. मळेकर यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
या स्वच्छता अभियानाचे मुख्य उद्देश श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त मंदिर व परिसरात आयोजित कार्यक्रम व प्रसाद वाटप यामुळे निर्माण झालेल्या कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावून मंदिर व परिसर स्वच्छ सुंदर बनविणे हे होते. स्वच्छता अभियान नंतर श्री गजानन महाराज मंदिर व परिसर पाहता पूर्णत: स्वच्छ झाल्याचे दिसून आले यातून स्वच्छता अभियानाचे उद्देश पुर्ती झाल्याचे समजते.
महाविद्यालयाद्वारे राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानातून स्वच्छतेचे महत्व आणि स्वकष्ट व स्वपुढाकारातून अस्वच्छतेतून स्वच्छतेकडे होणारी वाटचाल हा संदेश समाजास मिळतो.
संस्थेचे अध्यक्ष मा श्री एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर व तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ एम. ए. चौगुले व उपप्राचार्य श्री एस. के. मोहिते यांनी सदर कार्यक्रमारिता कौतुक केले आणि यापुढेही असे समाजप्रबोभनात्मक कार्यक्रम घेण्यात यावेत अशी इच्छा व्यक्त केली.























