जेऊर – श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर वडशिवणे गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभ हस्ते झाले. तर समारोप कार्यक्रम श्री गोविंद जगदाळे, रोटरी क्लब अध्यक्ष,वाल्हेकर वाडी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
बुधवार दि. 31 डिसेंबर 2025 ते 6 जानेवारी 2026 या सात दिवसाच्या कालावधीत हे शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेचे दुत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सुरुवातीस गावातून स्वच्छतेचा संदेश देणारी घोषणा देत फेरी काढण्यात आली व त्यानंतर गावात श्रमदान करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर श्रमदानाचे संस्कार घडविले जातात असे सांगितले. समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री गोविंद जगदाळे सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. वृक्षारोपणाच्या विधायक कार्यातून पर्यावरण संतुलन साधले जाते असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधनेचे त्यांनी आवाहन केले. यावेळी श्री गोरख काका पारखे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला.
या विशेष श्रमसंस्कार शिबिर अंतर्गत प्रभात फेरी, श्रमदान, क्षेत्रीय भेट, स्मशानभूमी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर , चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,विविध विषयावरील उद्बोधक व्याख्याने संपन्न झाली.
या शिबिरामध्ये रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या वतीने प्लास्टिक मुक्त कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लबच्या प्लास्टिक मुक्ती अभियानाचे वेगवेगळे संदेश बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मणराव राख यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमास प्राचार्य श्री माधव बेले, सरपंच श्री विशाल जगदाळे, उपसरपंच श्री अमोल उघडे, श्री गोरख आप्पा जगदाळे, श्री दत्तात्रय साळुंखे, श्री गणेश पवार, श्री कुबेर कोडलिंगे, श्री रत्नाकर कदम, श्री मुकुंद वाघमारे, श्री रेवन टकले श्री गणेश कवडे, श्री लक्ष्मणदादा मोरे, श्री संतोष कवडे, श्री नागनाथ जगदाळे, श्री सुशील कोडलिंगे, श्री सोमनाथ टकले, मुख्याध्यापक श्री भीमराव भोसले, मुख्याध्यापक श्री हरिदास मोळीक , श्री नागनाथ मोरे, श्री नवनाथ लोंढे, ग्रामसेविका सौ.माने मॅडम, श्री वसंत तळेकर, श्री सचिन रणशृंगारे, वडशिवणे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम प्रमुख प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा.डॉ.संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे , प्रा.एस.के. पाटील, प्रा. सतीश बनसोडे, श्री ओंकार घाडगे हे उपस्थित होते

















