भोकर(प्रतिनिधी)आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनूषंगाने भाजपाकडुन श्रीजया अशोकराव चव्हाण ह्या ईच्छुक असुन मतदार संघात वातावरण निर्मिती साठी सध्या गावभेटीचा कार्यक्रम सुरु असून तालूक्यातील कामनगाव येथे दि.१९ रोजी ग्रामस्थांच्या भेटीसाठी गेल्या असता त्यांच्या समोर येथील यूवक “एक मराठा लाख मराठा ” घोषणा देत जाब विचारल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकारे मुळे राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सूरु आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघ हा प्रारंभी पासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पक्षांतर केले व त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे विजयी झाले अशोकराव चव्हाण यांनी केलेला पक्षप्रवेश मतदारांच्या पचनी पडला नाही हे स्पष्ट झाले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण ह्या ईच्छुक आहेत.त्यामुळे श्रीजया चव्हाण यांनी वातावरण निर्मितीसाठी भोकर विधानसभा क्षेत्रातील मतदारांच्या भेटी गाठी घेऊन संवाद साधत आहेत.
दरम्यान कामनगाव येथील ग्रामस्थांना भेटण्यासाठी गेले असता तेथील यूवकानी “एक मराठा लाख मराठा ” घोषणा देऊन त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात जाताना रोखले. पहिले मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा असा जाब विचारला तेंव्हा काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यांच्या समवेत स्थानिक भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकारामूळे राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहे.