पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव भागातील शेतकऱ्यांना मकेला चांगला दर मिळावा म्हणून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने याठिकाणी ताबडतोब हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी पिलीव परिसरातील शेतकऱ्यांमधुन होत आहे. पिलीव ही मोठी बाजारपेठ आहे .याठिकाणी आसपासच्या दहा _ बारा खेडेगावातील शेतकरी व इतर सर्व सामान्य नागरिकांचा कायम वावर असतो.या भागातील शेतकरी ऊस पिकानंतर सगळ्यात मकेचे पिक घेतात. यामुळे या मकेचे मोठे उत्पादन होते. हे गाव अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत येते .
याठिकाणाहुन बाजार समितीला आठवडी बाजार, खाजगी मका खरेदी विक्री तसेच पिलीव येथील याञेतुन मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते माञ अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती याठिकाणी पिलीव गावाला त्यांच्या मार्फत कोणत्याच सोयी सुविधा पुरवित नाही .या कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक निवडुन जातात पण ते कधीच शेतकऱ्यांना काही सोयी सुविधा द्याव्यात या भुमिकेत दिसुन येत नाहीत. गेल्या महीन्यात मकेचा दर 2300 रुपये प्रती क्विंटल होता तोच दर ह्या महीन्यात 1700 ते 1800 रुपये प्रती क्विंटल एवढा आहे.एकाच पाचशे ते सहाशे रुपये एवढा दर कमी झाला.
ह्या दराने मका विक्री करणे शेतकऱ्यांना कसलेच परवडत नाही जमिनीची मशागत करणे, मका पेरणे ,तणनाशक फवारणी ,अळीची फवारणी,खत टाकणे ते मका काढुन विक्री करेपर्यंतचा जर खर्च मजुरी काढली तर मकेला 3000 हजार रुपयांपर्यंत प्रती क्विंटल दर मिळणे अपेक्षित असताना केवळ 1700 ते 1800 रुपयांवर दराची बोळवण अपेक्षित नाही. सध्या पावसामुळे पिलीव भागात मका पिकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.यामुळे मकेचे या भागात या हंगामात उत्पन्न कमी असतानाही दर पडले आहेत.
या भागात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे मुरघासासाठी मोठ्या प्रमाणात मका वापरली जाते राहिलेली मका ही उत्पन्नासाठी असते.खाजगी व्यापारी ठरवुन तसेच एकमेकांना संपर्क करून दर ठरवितात असे शेतकऱ्यांमधुन बोलले जात आहे.खाजगी व्यापाऱ्यावर दराबाबत शासनाचे कसलेच नियंत्रण नसल्यामुळेच खाजगी व्यापारी दराबाबत शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लुट करीत आहेत. सध्या मकेचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांनी मका विक्री करण्याऐवजी मका घरी ठेवत दरवाढ कधी होते याकडे लक्ष ठेवून
शेतकरी दरवाढी कडे लक्ष ठेवुन आहेत. शासनाने दराबाबत ठोस भुमिका घेऊन अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देणे आवश्यक आहे. खाजगी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची दराबाबत होणारी लुट थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.
याविषयी कुसमोड येथील शेतकरी सुखदेव सोपान लेंगरे यांना विचारले असता मी पाऊस थांबल्यानंतर मका गडबडीने काढली त्यावेळी 2300 रुपये प्रति क्विंटल दर होता तोच दर सध्या 1700 ते 1800 रुपयांपर्यंत खाली आल्याने मी मका विक्री न करता घरीच साठवून ठेवली असुन दर कधी वाटतोय याकडे लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगीतले.


















