जालना / अंबड खुलताबाद : समृद्धी साखर कारखान्याच्या युनिट नंबर-२ ‘घृष्णेश्वर शुगर्स’च्या सातव्या गाळप हंगामाचा शुभारंभ खुलताबाद तालुक्याचे भूमिपुत्र तथा घृष्णेश्वर शुगर्सचे व्हाईस चेअरमन श्री महेंद्रजी मेठी यांच्या मातोश्री सौ. मीराताई रमेशराव मेठी व वडील श्री. रमेशदादा मेठी यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी समृद्धी शुगर्सचे चेअरमन सतीश घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. खुलताबाद तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी चांगला भाव देण्याचा प्रयत्न कारखाना करेल, असे कारखान्याचे व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी याप्रसंगी सांगितले.
खुलताबाद तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हक्काचा साखर कारखाना उभा करण्यासाठी तालुक्याचे भूमिपुत्र घृष्णेश्वर शुगर्सचे व्हाईस चेअरमन महेंद्रजी मेठी व समृद्धी शुगर्सचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या प्रयत्नातून घृष्णेश्वर साखर कारखाना पुनरूज्जीवित झाला. बुधवारी घृष्णेश्वर शुगर्सचा सातवा बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पूजन सोहळा परिसरातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
घृष्णेश्वर साखर कारखाना खुलताबाद, फुलंब्री आणि कन्नड भागातील शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाहेरच्या कारखान्यांना ऊस न देता समृद्धीच्या युनिट नंबर-२ घृष्णेश्वर साखर कारखान्यावर विश्वास ठेवावा. असे आवाहन व्हाईस चेअरमन महेंद्रजी मेठी व चेअरमन सतीश घाटगे यांनी केले.
या शुभारंभ सोहळ्यास समृद्धी शुगर्सचे ज्येष्ठ संचालक सतीशराव चव्हाण, जितेंद्रजी मेठी, रमेश दादा घाटगे, प्रदीप घाटगे, मुख्य लेखापाल सुनील देसाई, लेखापाल रियाज शेख, प्रवीण काळे, शुगर सेल ऑफिसर प्रकाश देशमुख, देवनाथ जाधव, समृद्धीचे मुख्य शेतकी अधिकारी अमोल तौर यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
“खुलताबाद – फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी घृष्णेश्वर साखर कारखाना कटिबद्ध आहे. अनेक वर्षे शेतकऱ्याला बाहेरच्या कारखान्यांवर अवलंबून राहावे लागायचे. मिळेल त्या भावात ऊस द्यावा लागायचा. परंतु, आता ती वेळ त्यांच्यावर आम्ही येऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न घृष्णेश्वर साखर कारखाना करणार आहे.”
*–महेंद्र मेठी, व्हाईस चेअरमन, समृद्धी साखर कारखाना
भा करण्यासाठी माजी मंत्री अशोक पाटील डोनगावकर साहेब यांचे आयुष्य गेले. हा कारखाना खुलताबाद तालुक्यातील भूमिपुत्राचा आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याबरोबरच ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात सुधारित उसजातीचे बेणे पुरवून लागवडीसाठी शेतकी विभागाच्यामार्फत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न कारखाना करणार आहे.
सतीश घाटगे, चेअरमन, समृद्धी साखर कारखाना*




















