परतुर / प्रतिनिधी
355 कोटी रुपये किंमत असलेल्या परतूर सेलू मानवत रोड सिमेंट रस्त्याच कामाची तातडीने वर्क ऑर्डर करून सदरील रस्त्याच काम चालू करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी दिल्या. या रस्त्या करीता केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना आपण भेटून निधी मंजूर करून आणल्याचंही आमदार बबनराव लोणीकर यांनी
यावेळी सांगितलं समिती कक्ष, मुख्य अभियंता, सां.बां. प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर येथे आज मा.ना. श्री. रविंद्र चव्हाण साहेब, मंत्री, सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग व नांदेड विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. या वेळी ते बोलत होते. या आढावा बैठकिस जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांच्या सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे नांदेड व छत्रपती संभाजी नगर या दोन्ही विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना आमदार लोणीकर म्हणाले की परतूर शहरातील उड्डाणपुलाचे अर्धवट असलेल काम तातडीने पूर्ण करून सर्व्हिस रोड च बाकी असलेल काम लवकर पूर्ण कराव अश्या सूचना आमदार लोणीकर यांनी दिल्या. या बरोबर च जालना शहरातील रजिस्टरी कार्यालयाच्या नवीन इमारती करीता आमदार लोणीकर यांनी निधी ची मागणी या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय चव्हाण साहेब यांच्या कडे करताच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी निधी देण्याच कबुल केल असल्यामुळे आमदार लोणीकर यांच्या मागणी मूळे लवकरच रजिस्ट्री कार्यालयाची नवीन वस्तू साकारणार आहे. या वेळी आमदार लोणीकर यांनी परतूर विधानसभा मतदार संघातील रस्ते व पुलाच्या नवीन बांध कामास निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी लावून धरली होती.
सन 2022 ते आजपर्यंत मंजूर झालेल्या कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश तात्काळ निर्गमित करणे, सा.बां. प्रादेशिक विभागा अंतर्गत रिक्त पदांचा तपशिल व वर्ग-3 व वर्ग-4 रिक्त पदे भरणेबाबत केलेली कार्यवाही, उपअभियंता/कार्यकारी अभियंता बदली किंवा पदोन्नतीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत अशा अभियंत्यांवर केलेली कारवाई, मा.आमदार व मा. खासदार महोदय व इतर लोकप्रतिनिधी यांची मतदारसंघनिहाय प्रलंबित कामे, निविदेच्या मंजूर रकमेपेक्षा जास्त खर्च न करणे, पावसाळी परिस्थितीमध्ये विभागांतर्गत येणारे सर्व रस्ते, पुल व इमारती तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुस्थितीत ठेवणे, नवीन पेट्रोलपंपाचे आराखडे मंजूर करतांना घ्यावयाची दक्षता, प्रादेशिक विभागातील मंजूर कामांचे अभासी पध्दतीने भूमिपूजन व उद्घाटन या विषयी आढावा घेण्यात आला.