सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लंवगी
येथील सरपंच संगमेश बगले पाटील यांना नालंदा आर्गनायझेशन राज्यस्तरीय ग्रामसमृद्धी योजनेत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल पुणे येथे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन जिल्हा कृषी अधिकारी पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आला. ल
ंवगी गावात कोट्यावधी निंधीची विकासकामे करुन गाव सुजलाम सुफलाम करण्यासाठी गावातील लोकांच्या सहकार्याने आमदार सुभाष देशमुख आणि सुरेश हसापुरे यांच्या जिल्हा परिषद फंडातून निधी उपलब्ध करून सुंदर गाव बनविण्याचे कामे केली. संगमेश बगले पाटील यांनी यापूर्वी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले लवंगी गावाला बगले पाटील यांच्या नावारुपाने पहिल्याच राजस्तरीय पुरस्कार मिळाला. उपसरपंच कल्लप्पा भगणगेरी ग्राम पंचायत सदस्य शिवगोडा बगले, अश्विनी बनसोडे भिमाबाई कोळी, कमलाबाई औटगी, सरस्वती नंदर्गी आदिंचे सहकार्य लाभले.
























