सांगोला – अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई यांच्यातर्फे चालू शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सांगोल्यातील उत्कर्ष प्राथमिक विद्यालयाला राज्यस्तरीय आदर्श प्रशाला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच इ.३ ची विद्यार्थिनी मुक्ता राऊत हिने अष्टपैलू गुणवंत विद्यार्थी राज्यस्तरीय पुरस्कार पटकावून विद्यालयाचा मान उंचावला आहे.
या यशात विद्यालयातील अन्वयी आमले, पार्थ नागणे, प्रेम हागरे, प्रीता देशपांडे, साक्षी वसमळे, रुद्र दिवटे, रणजीत बनकर या विद्यार्थ्यांचाही मोलाचा वाटा आहे. याबरोबर संस्थाध्यक्ष प्रा.नीलिमा कुलकर्णी, माजी मुख्याध्यापिका सुशीला नांगरे-पाटील यांना उत्कृष्ट काव्यलेखन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार दि.१८ जानेवारी २०२६ रोजी आळंदी येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. या यशाबद्दल संस्थापिका डॉ.संजीवनी केळकर, संस्थाध्यक्ष नीलिमा कुलकर्णी, मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विश्रांती मागाडे, उपमुख्याध्यापिका स्वराली कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रशांत भोसले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

























