Wednesday, June 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वैकुंठ स्मशानभूमीतील बंद असलेली गँस दाहिनी त्वरीत दूरुस्त करण्याची मागणी

तरुण भारतbyतरुण भारत
February 14, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर –  येथील वैकुंठ स्मशानभूमीतील ५० लाख रुपये खर्चुन बसविण्यात आलेली गँस दाहिनी गेल्या दोन,चार वर्षापासून बंदच आहे. त्यामुळे आपल्या आप्तस्वकीयांच्या पार्थिवावर या गँसदाहिनी मध्ये अंत्यसंस्कार करण्याची इच्छा असताना देखील मृतांच्या नातेवाईक मंडळींना येथील स्मशानभूमीमध्ये सध्या पारंपारिक पध्दतीनेच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यामुळे बंद असलेली गँस दाहिनी त्वरीत सुरु करावी अशी मागणी शहर व उपनगरातील नागरिकांमधुन केली जात आहे.


येथील वैकुंठ स्मशानभूमीत मृतदेहावर लाकडाचा वापर करुन अंत्यसंस्कार करण्यात येत होते. लाकडाच्या वाढलेल्या किंमती आणि लाकूड वापरामुळे प्रचंड प्रमाणात होत असलेले प्रदूषण तसेच दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे बिघडत चाललेले संतुलन यामुळेच इंधनासाठी लाकडा ऐवजी सोलार किंवा गँसचा वापर करण्यावर केंद्र व राज्य सरकारकडून भर दिला जात आहे.


दरम्यान पंढरपूरातील वैकुंठ स्मशानभूमीत राज्यसभेचे तत्कालीन खासदार राजकुमार धुत यांच्या खासदार निधीतून पन्नास लाख रुपये आणि येथील नगरपालिकेने काही निधी खर्चुन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गँस दाहिनी उभी केली होती. 


गँस दाहिनी उभी करण्यात आल्यावर देखील येथील स्मशानभूमीत पारंपारिक पध्दतीने आणि गँस दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्याची सुविधा पालिकेकडून नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. सुरुवातीला काही दिवस मृतांच्या अनेक इच्छुक नातेवाईकांकडून या गँस दाहिनीमध्ये आपल्या आप्तस्वकीयाच्या मृतदेहांवर अंत्यंस्कार करण्यात आले होते. तर ज्यांना गँसदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करणे पटत नव्हते ते पारंपारिक पध्दतीने आपल्या नातेवाईकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करीत होते.


मात्र गँस दाहिनी सुरु झाल्यावर काही महिन्यांमध्येच कोरोनाच्या एक, दोन लाटा आलेल्या होत्या. त्या काळात कोरोना आजारामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करताना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या इतरांना कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये याची काळजी घेवून अंत्यसंस्कार करण्याच्या प्रशासनाकडून काही मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यावेळी अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा देखील लावण्यात आलेल्या होत्या. त्यावेळी सुरुवातीला तर कुटुंबातील एक, दोघां सदस्यांच्या उपस्थितीत पालिका कर्मचाऱ्यांकडूनच कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते.


येथील स्मशानभूमीत देखील खबरदारी घेऊन कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर सुरुवातीला काही दिवस गॅस दाहिनीद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी येथील नगरपरिषदेकडून एक हजार रुपये एवढा माफक दर आकारण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींच्या काळात अंत्यविधीसाठीचा येणारा खर्च देखील कमी झाला. पर्यायाने होणारे प्रदूषणही देखील रोखले गेले. या बरोबरच अंत्यसंस्कार करताना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका देखील कमी झाला होता ही एकीकडे वस्तुस्थिती होती. 
तर दुसरीकडे मात्र कोरोनामुळे झालेले मृतदेह जाळल्यामुळे याचा परिणाम विपरीत झाला. कारण कोरोनामुळे मृत झालेले मृतदेह हे प्लास्टिक बँग मध्ये ठेवलेले असायचे. त्यामुळे अशा पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना तो गँस दाहिनी मध्ये तसाच ठेवला जायचा. अशा प्रकारे कोरोनामुळे मृत झालेल्या अनेकांच्या पार्थिवावर त्यावेळी या गँसदाहिनी मध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे गँस दाहिनीच्या चिमणी मध्ये काजळी चढत गेली. परिणामी पर्यावरण पूरक असणारी ही गँस दाहिनी बंद पडली.


दरम्यान पालिकेकडून पुन्हा या गँस दाहिनीच्या दूरुस्तीसाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे गेल्या दोन,चार वर्षापासून शहर तसेच उपनगरातील नागरिकांना आपल्या नातेवाईकाच्या मृतदेहावर गँस दाहिनी मध्ये अंत्यसंस्कार करण्याची इच्छा असून देखील गँस दाहिनी बंद असल्यामुळे त्यांना पारंपारिक पध्दतीनेच लाकडे जाळून अंत्यसंस्कार करावे लागत आहे. पारंपारिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी खर्च देखील मोठा येतो आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे यासाठी वृक्षतोड देखील करावी लागत आहे. पावसाळ्या मध्ये लाकडे ओली असल्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना कमालीचा त्रास होत असतो.
त्यामुळे पालिकेने या सर्व बाबींचा विचार करुन लवकरात लवकर गँस दाहिनीच्या दूरुस्तीचे काम हाती घ्यावे. येत्या काळात ती दूरुस्त करावी आणि नागरिकांना गँस दाहिनीमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची सुविधा पुन्हा एकदा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी शहर तसेच उपनगरातील सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.
—————————

वारंवार बातम्या प्रसिध्द मात्र पालिका प्रशासन धिम्म

या बाबत दैनिक सोलापूर तरुण भारत मधून देखील वारंवार बातम्या देखील प्रसिध्दीस देण्यात आलेले आहे. मात्र नगरपालिका प्रशासन धिम्म असून या बाबत कोणतीही ठोस कार्यवाही प्रशासनाकडून केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
————————


गँस दाहिनी दुरुस्त झाल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे सोपे होईल. या बरोबरच होणारे प्रदूषण टाळले जाईल,पर्यावरणाचा होणारा ऱ्हास देखील थांबला जाईल. त्यामुळे पालिकेने त्वरीत बंद पडलेली गँस दाहिनी सुरु करावी अशी आमची विनंती आहे. 
सुनील सुर्यवंशी (शहरातील नागरिक)
————————–
फोटोओळी : पंढरपूर : येथील वैकुंठ स्मशानभूमीतील गँस दाहिनी सध्या बंद असल्यामुळे मृतदेहांवर पारंपारिक पध्दतीनेच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

Post Views: 33
Previous Post

शांती चौकातील हिंदू स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी

Next Post

नेताजी प्रशालेत दहावी विद्यार्थ्यांना निरोप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नेताजी प्रशालेत दहावी विद्यार्थ्यांना निरोप

ताज्या बातम्या

गोकुळच्या ऊसबिलासाठी शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजी तलावात उड्या मारल्या

June 10, 2026

निर्मिती विहार मध्ये ७४ वर्षीय वृद्धाचा गळा दाबून खून #solapurnews #viral

June 10, 2026

सोलापुरात आनंदाने काम करू शकलो कुमार आशीर्वाद

June 10, 2026

गर्भलिंग निदान परीक्षण प्रतिबंध कायदयाचे आशा वर्कर आरोग्य सेवकांना प्रशिक्षण द्या जिल्हाधिकारी

June 10, 2026

आता अपघात स्थळी वेगाने येणार अँम्ब्युलन्स ;जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांचा आदेश

June 10, 2026

नुमवि शाळेत विविध विषयांच्या पाट्या घेऊन मुलांचे केले स्वागत

June 9, 2026
MHT- CET परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

MHT- CET परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

June 9, 2026
राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने करमाळ्याचे प्रा.बाळकृष्ण लावंड सन्मानित

राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने करमाळ्याचे प्रा.बाळकृष्ण लावंड सन्मानित

June 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902546

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697