भोकर(प्रतिनिधी)भोकर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडवून घेवून मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मला शिवसेनेकडून उमेदवारी देऊन संधी दिली तर मोठ्या ताकदीने निवडणूक लढवुन विधानसभेवर भगवा फडकवण्याचा संकल्प शिवसेना तालुकाप्रमुख अमोल पवार यांनी केला आहे.
लोकसभा निवडणूक संपली असून आता महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणूका दिवाळी पर्यंत पार पडतील असा अंदाज व्यक्त करित असल्याने आतापासूनच आगामी होणार्या विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु झाली असुन सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.
भोकर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदार संघ असुन या मतदारसंघात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहीलेला पक्ष आहे. मतदारांमध्ये धनुष्यबाण या चिन्हांची ओळख असुन या चिन्हा बद्दल सहानुभूती असुन हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असुन शिवसेनेने हा मतदारसंघ पक्षासाठी सोडवुन घेतल्यास या मतदारसंघात शिवसेनेचा नक्कीच विजय होणार आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी हा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडवुन घेवून उमेदवारी दिली तर मी तन-मन-धनाने निवडणूक लढवणार व भोकर विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकु असा निर्धार शिवसेना तालुकाप्रमुख अमोल धनराज पवार यांनी व्यक्त केला.