खरीप अनुदान वाटपासाठी तहसीलदार यांना निवेदन
देगलुर/ प्रतिनीधी
देगलूर तहसील कार्यालय येथे सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी करून सुद्धा सोयाबीन अनुदान वाटपासाठी गाव पातळीवर प्राप्त ई पीक पाहणी यादीमध्ये नावाची नोंद नसल्यामुळे अनेक शेतकरी बांधव अनुदानापासून अपात्र ठरलेले आहेत त्यामुळे त्या शेतकऱ्यांना योग्य चौकशी करून अनुदान द्यावे असे निवेदन माननीय तहसीलदार साहेब देगलूर यांना कुरूडगी गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले यावेळी कुरूडगी नगरीचे मा. सरपंच श्री सदाशिवराव पाटील, सरपंच प्रतिनिधी श्री शंकरराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश कोकले व तसेच शाहीर कोकले उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार साहेबांनी निवेदन स्वीकारून अपात्र झालेल्या शेतकऱ्यांची नावे शासनाला कळविण्याचे आश्वासन दिले.