बिलोली / नांदेड – बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे स्थंलातर करण्याच्या हालचालीची चर्चा होत आसुन तरी या भागातील खातेदारांची गैरसोय लक्षात घेऊन वरीष्ठानी स्थलांतरांचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.
बिलोली तालुक्यातील लोहगाव हे गाव जवळपास सात ते आठ हजार लोकवस्तीचे गाव असून या ठिकाणी अनेक छोटी-मोठे व्यवसायिक असून या शाखेस या भागातील जवळपास पंधरा ते विस गावचा समावेश असून अनेक व्यवसायिका बरोबर शेतकरी मोठया संख्येनी या बँकेशी नाळ जोडल्या गेलेली आहे.
तरी ही शाखा या भागातील खातेदारासाठी अत्यंत महत्त्वाची असून भविष्यात या शाखेशी जोडल्या गेलेल्या खातेदारांची व जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या शाखेचे ईतरञ स्थलांतर न करता येथेच कायमस्वरूपी आसावी अशी मागणी बिलोली तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दिनांक ८ डिसेंबर सोमवार रोजी बिलोली तहसीलदार गजानन शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.शिवाजी पाटील पाचपिपळीकर, दिलीप पांढरे,राजु पा. शिंपाळकर,पांडुरंग पा.रामपुरे, तिरुपती पा. हिवराळे, माधव पा. नरवाडे, हाणमंत नरवाडे, नरसिंग मोंडेवाड, सयाराम निदाने, प्रल्हाद वानोळे, आनिल तोटावाड, सुर्यकांत नरवाडे,यांच्यासह अनेकांच्या सहयाचे निवेदन देण्यात आले.

























