Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू असलेल्या अंगणवाड्यांना स्वतःची हक्काची इमारत द्या!

तरुण भारतbyतरुण भारत
December 9, 2025
in marathwada
0
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माहूर / नांदेड – मुलांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असलेल्या अंगणवाड्यांमध्ये मुलांना पूर्व-शाळा शिक्षण देण्यासाठी जागा, स्वतंत्र स्वयंपाकघर,

मुलांसाठी शौचालय, पिण्याचे पाणी आणि खेळाची योग्य सोय आवश्यक असते. जिथे पोषण, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित सेवा दिल्या जातात. परंतु माहूर शहरातील एकात्मिक बाल विकास सेवा नागरी प्रकल्प क्रमांक-३ नांदेड अंतर्गत सुरू असलेल्या १५ अंगणवाड्यांच्या खोल्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असल्याने सध्या भाड्याच्या घरात सुरू असलेल्या ह्या अंगणवाड्यांना हक्काची जागा उपलब्ध करून स्वतःची इमारत देऊन सोयी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी,मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्याकडे दि. ०८ डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

अंगणवाडी ही भारत सरकारने १९७५ मध्ये सुरू केलेली ग्रामीण माता आणि बाल संगोपन केंद्र असून, ही केंद्रे ६ वर्षांखालील मुलांसाठी आरोग्य, पोषण आणि पूर्व-प्राथमिक शिक्षण यांसारख्या सेवा पुरवतात. या केंद्रांमध्ये गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता आणि ६ वर्षांपर्यंतच्या मुलांची काळजी घेतली जाते. व जेथे ३ ते ६ वयोगटातील मुलांना औपचारिक शिक्षणाची तयारी करून घेण्यासाठी शिक्षण दिले जाते.


अंगणवाडी एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रमाचा एक भाग आहे, जो ६ वर्षांखालील मुलांसाठी आणि त्यांच्या मातांसाठी आरोग्य, पोषण आणि शिक्षण सेवा एकत्रितपणे पुरवतो.

माहूर शहरात एकात्मिक बाल विकास सेवा नागरी प्रकल्प-३ अंतर्गत १५ अंगणवाड्यात जवळपास ५०० बालकं पूर्व-प्राथमिक शिक्षण घेत आहेत. या सर्व अंगणवाड्या भाड्याच्या घरात असून, दोन अंगणवाड्या ग्रामपंचायत काळातील बांधकाम झालेल्या आहेत. त्यामुळे त्याही मोडकळीस आलेल्या आहेत त्यामुळे अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविका ह्या वरिष्ठ कार्यालय आणि नगरपंचायत कडे या अंगणवाड्यात शिक्षण घेणाऱ्या मुलांचे भविष्य धोक्यात आल्याने अंगणवाड्यासाठी नवीन जागा, नवीन इमारत आणि सेवा सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी करत आहेत.


सध्या ह्या अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किंवा भाड्याच्या जागांमध्ये चालविल्या जात असून जिथे ३ ते ६ वयोगटातील मुलांना पूर्व-प्राथमिक शिक्षण, पोषण आहार आणि आरोग्य तपासणी करावी लागते.


या अंगणवाड्यांमध्ये मुलांना खेळ-आधारित शिक्षण देण्यासाठी पुरेशी जागा, मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय,पौष्टिक आहार बनवण्यासाठी स्वतंत्र स्वयंपाकघर,अन्न आणि इतर साहित्य ठेवण्यासाठी स्टोअर रुम, खोलीमध्ये आणि बाहेर खेळण्यासाठी जागा अपुरी पडत आहे.तसेच याठिकाणी पूरक पोषण, लसीकरण, आरोग्य तपासणी, आणि पूर्व-शाळा शिक्षण यांसारख्या सेवा पुरविणाची जबाबदारी या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना नाईलाजाने उचलावी लागत आहे.


याविषयीची वारंवार निवेदने देऊनही वरिष्ठ कार्यालयाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने माहूर शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आज मोठ्या अपेक्षेने नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी आणि मुख्याधिकारी विवेक कांदे यांची भेट घेऊन मागण्या सादर केल्या.


यावेळी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत दोन महिन्याच्या आत जुन्या अंगणवाड्यांची दुरुस्ती आणि नवीन अंगणवाड्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून प्रकरण निकाली काढू, असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी अंगणवाडी सेविका संघटनेच्या अध्यक्षा सत्त्वशीला पंडित, वंदना जाधव, सुनीता भगत, मीना मनवर, सुनिता पवार, रेणुका पत्की, अंजली खडसे, सीमा पद्मावार, शीतल सौंदलकर, नबुबाई वानखेडे, चित्रा देशपांडे, सलमा शेख युसूफ, शारदा दूद्दलवार, कांता स्वामी, सुलोचना कमठेवाड यांचे सह कार्यालय अधीक्षक संदीप गझलवाड, लेखापाल विशाल मरेवाड, अभियंता रोहित डुकरे, विशाल ढोरे, स्वाती गुव्हाडे, धनंजय कळसकर, मझहर शेख, विजय शिंदे यांचे कर्मचारी उपस्थित होते.


शहरातील अनेक अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही आणि त्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किंवा इतर भाड्याच्या खोल्यांमध्ये चालविल्या जात आहेत. ज्यामुळे याठिकाणी सुविधांची कमतरता भासत आहे.


शासनाने अंगणवाड्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्याचे निकष ठरवले आहेत, पण अंमलबजावणीत सुधारणांची गरज असल्याचे सदरील निवेदनातील मागणीवरून जाणवत आहे.

Post Views: 158
Previous Post

लोहगाव येथील एसबीआय बँकेच्या शाखेचे स्थलांतर थांबवा – काँग्रेस पक्षाची मागणी

Next Post

अ.ब.क.ड. उपवर्गीकरणसाठी आ. जितेश अंतापुरकरांनी वेधून घेतले राज्यशासनाचे लक्ष

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अ.ब.क.ड. उपवर्गीकरणसाठी आ. जितेश अंतापुरकरांनी वेधून घेतले राज्यशासनाचे लक्ष

ताज्या बातम्या

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

June 17, 2026

साखर पेठ हुमा किलिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 17, 2026
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

June 17, 2026
ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

June 17, 2026
अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

June 17, 2026
वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

June 17, 2026
अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

June 17, 2026
जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0914391

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697