करकंब : जि.प.प्रा.शाळा जळोली (केंद्र उंबरे) येथे दिपावली निमित्त विद्यार्थ्यांकडून टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ आकाशकंदील बनवण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्लास्टिक बाटल्या,फूगे,लोकर.कात्री,आदी वस्तूपासून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी स्वतः आकाशकंदील तयार करत स्वनिर्मितीचा आनंद घेतला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारी जि.प.प्रा.शाळा जळोली पुढील काळातही विविध उपक्रम राबवणार असल्याचे मुख्याध्यापक अनिल जगताप यांनी सांगितले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक जयवंत कापसे,नागनाथ गायकवाड,सिध्देश्वर लोंढे,कैलास नरसाळे,बाळू खांडेकर,ज्ञानेश्वर दुधाणे,शिक्षिका देवकी कलढोणे (दुधाणे) यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले.