बार्शी – शासकीय अधिकारी साहित्य पुरस्कार, यशदा संस्था पुणे यांचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार साहित्यिका सौ. सुमन चंद्रशेखर बार्शी यांच्या ऋत प्रकाशनने प्रकाशित केलेल्या “मायेची पाखर” या कादंबरीला उल्लेखनीय साहित्य पुरस्कार दि. २२ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा संवर्धन समिती संवाद पुणे, यशदा पुणे आयोजित दुसरे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन २०२६ मध्ये बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे सुनील महाजन संवाद, पुणे सचिन ईटकर, शेखर गायकवाड, अतिरिक्त महासंचालक यशदा पुणे, महेश भागवत, अतिरिक्त पोलीस आयुक्त तेलंगणा तथा संमेलना अध्यक्ष डॉ. किरण धांडे प्रभारी प्रशासन आधिकारी प्रशासन विभाग यांचे हस्ते मिळाला.
सौ. सुमन चंद्रशेखर यांचा नेहमी साहित्य चळवळीत सहभाग असतो . त्यांची आतापर्यंत आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याबद्दल मसाप. शाखा बार्शीचे अध्यक्ष निपाणीकर, कवी कालिदास मंडळचे अध्यक्ष रामचंद्र इकारे, साहित्यिक मुकुंदराज कुलकर्णी, दत्ता गोसावी, प्रकाश गव्हाणे, डॉ. रविराज फुरडे, शिवानंद चंद्रशेखर, श्रीमती शारदा पानगांवकर, आबासाहेब घावटे, सर्व साहित्यिक, मान्यवर आणि सर्वच स्तरावरुन सौ. सुमन चंद्रशेखर यांचे अभिनंदन केले जात आहे.

























