नवी दिल्ली – भारतीय दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित 41व्या राष्ट्रीय परिषदेत “बाबासाहेब डॉ. आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड – 2025” हा मानाचा सन्मान आज मोठ्या थाटात प्रदान करण्यात आला.
या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात भारत देशातील सर्व राज्यांमधून निवड झालेल्या प्रतिनिधींनाही त्यांच्या राज्याच्या उभारणीतील योगदानानुसार सन्मानित करण्यात आले. विविध प्रांतांतून आलेल्या विद्वान, समाजसेवी, साहित्यिक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने पंचशील आश्रम परिसर उत्साहाने दुमदुमून गेला.
याच वेळी महाराष्ट्र राज्यातून निवड झालेल्या एकमेव प्रतिनिधी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सुजित सुरेश हावळे यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. महाराष्ट्राच्या वतीने देण्यात आलेला हा एकमेव राष्ट्रीय गौरव असल्याने हा क्षण अधिक अभिमानाचा ठरला.
अकादमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. पी. सुमनाक्षर यांच्या हस्ते सुजित हावळे यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि मेडल प्रदान करण्यात आले.
सुजित हावळे गेली अनेक वर्षे वंचित, भटके-विमुक्त, निराधार, ऊसतोड मजूर, विटभट्टी मजूर आणि आदिवासी मुलांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. कोविड काळातील मदत, शैक्षणिक सहाय्य, सामाजिक जनजागृती, लेखन व सेवा कार्यामुळे त्यांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली.
पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सांगितले –
“हा सन्मान महाराष्ट्राचा आणि सोलापूरचा आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्याची माझी बांधिलकी यामुळे अधिक बळकट झाली आहे.”
या ऐतिहासिक यशाबद्दल सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


























