सोलापूर – इंडियन रेड क्रॉस सोसायटी चे चेअरमन डॉ राजीव प्रधान यांच्या मार्गदर्शनाने व मानद सचिव श्री जयेश पटेल यांच्या अथक परिश्रमाने 28 जून 2024 रोजी रोटरी रेड क्रॉस थालेसेमिया सेंटर ची सुरुवात झाली. आपणास थालेसेमिया हा आजार नाही ना ? ही तपासणी या सेंटर मध्ये केली जाते की जेणेकरून प्रत्येकाने ही तपासणी केल्यास होणार्या आपत्यास हा आजार होऊ नये याबद्दलची काळजी या तपासणी मार्फत केली जाते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बालरोग तज्ञ डॉ अतुल झंवर होते. त्यांचे मनोगत व्यक्त करताना त्यांनी लग्नापूर्वी सर्व युवक युवतींना ही तपासणी करून घेणे आवश्यक आहे असे संगितले. डॉ अतुल झंवर व डॉ राजीव प्रधान यांनी थालेसेमिया रूग्णांच्या पालकांसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास इंडियन रेड क्रॉस सोसायटी चे चेअरमन डॉ राजीव प्रधान, मानद सहसचिव श्री खुशाल ढेढिया संचालक श्री राज मिनियर, श्री संदीप जंवेरी, डॉ श्रीकांत येळेगावकर , डॉ शिरीष कुमठेकर व रोटरी रेड क्रॉस थालेसेमिया सेंटर च्या चेअरमन डॉ ज्योती चिडगुपकर, रोटरी क्लब ऑफ सोलापूर च्या प्रेसिडेंट सौ धनश्री केळकर व सेक्रेटरी श्री नीलेश पोफळिया उपस्थित होते. रोटरी रेड क्रॉस थालेसेमिया सेंटर चे अवेयरनेस डोनर श्री केतन वोरा, श्री राजू वोरा व श्री डाकलिया उपस्थित होते. इंडियन रेड क्रॉस सोसायटी च्या मेडिकल डायरेक्टर डॉ सुरेखा काडादी, मेडिकल ऑफिसर डॉ गौरी कहाते डॉ बेसकर तसेच माजी संचालक श्री भरत शाह तसेच थालेसेमिया पेशंट व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमात थालेसेमिया पेशंट साठि रांगोळी स्पर्धा , विविध खेळ घेण्यात् आले तसेच यावेळी विशेष प्रावीण्य मिळवलेल्या थॅलेसेमिया पेशंट मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात श्री अंकित धरमसी सोलापूर फार्म हब यांनी दमाणी रक्त केंद्राकरिता 6 स्टेथेस्कोप देणगी स्वरुपात भेट दिले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ रिता सोमानी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री खुशाल ढेढिया यांनी केले .


















