पुणे : बारामती येथे दिनांक 27 नोव्हेंबर 2025 ते 30 नंबर 2025 रोजी शालेय राज्यस्तरीय सॉफ्टटेनिस स्पर्धा संपन्न झाल्या .14 वर्षाखाली गटात तनुज संचेती ने आर्य पवार याचा 2/1 गुणाने पराभव करीतप्रथम क्रमांक पटकाविला .तर 14 वर्षाखालील मुलीच्या गटात मनस्वी राठोड हीच्या कडून मृण्मयी गायकवाड 2/0 ने पराभव स्वीकारत द्वितीय क्रमांक पटकाविला . तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या गटात भक्ती शिरसागर अमरावती विभाग हिच्या कडून विपश्यना सोनवणे 2/1 ने पराभव स्वीकारत द्वितीय स्थानी मजल मारली .या स्पर्धेत पुणे विभागाच्या संघाने वर्चस्व प्रस्थापित केले .14 वर्षाखालील मुला मुलींच्या पुणे विभागाच्या संघाने सुवर्णपदक पटकावले, 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने कास्यपदक तर मुलींच्या संघाने सिल्वर पदक प्राप्त केले. 19 वर्षाखालील गटात मुलींच्या संघाने कास्यपदक पटकाविले .पुणे विभागाच्या संघात सोलापूरच्या 16 खेळाडूं सहभाग नोंदविला होता . पुणे विभागाच्या संघात सोलापूरचे खेळाडू खालील प्रमाणे .
14 वर्षाखाली गटात 14 वर्षाखाली गटात
1) आर्य पवार – वि.मेहता प्रशाला सोलापूर
2) ऋषिकेश चव्हाण – लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल
3) तनुज संचेती – K L E इंग्लिश मीडियम स्कूल
4) देवांश क्षीरसागर डी बी एफ दमानी स्कूल सोलापूर
मुली
1) मृण्मयी गायकवाड -ऑर्किड इंग्लिश मीडियम स्कूल
2) आराध्या जाधवव – राज मेमोरियल स्कूल
3)नेत्रा मगर – सिंहगड स्कूल
4) प्रणव्या मेघनातन – इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल
17 वर्षाखालील मुले
1) अजिंक्य वसपटे -श्रीमती निर्मला ताई ठोकळ प्रशाला
मुली
1) विपश्यना सोनवणे -शांती इंग्लिश स्कूल
2) भवानी हिरेमठ – डी बी एफ दमाणी हायस्कूल
19 वर्षा खालील मुली
मुली
केतकी चौगुले ,भक्ती जाधवद संगमेश्वर जूनियर कॉलेज सोलापूर
यांना सुधीर सालगुडे महेश झांबरे , शिवाजी वसपटे, पूजा सालगुडे, बालाजी केदार चंद्रकांत वाघमोडे गणेश बंडगर यांचे मार्गदर्शन लाभले .
यशस्वी खेळाडूचे कौतुक व पुढील कार्यासाठी शुभेच्छा संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील ,सचिव प्राध्यापक संतोष गवळी , राज्य लॉन टेनिस मानद सचिव राजीव दे
साई , सहसचिव, शिवाजी वसपटे ,मारूती घोडके, प्रशांत वर्धमाने , व्यंकप्पा शेंडगे , अक्षय गवळी यांनी केले.

















