सोलापूर – येथील तांत्रिक क्षेत्रात अगदी सुप्रसिद्ध असलेल्या मौलाना जात पॉलीटेक्निक होटगी येथील कॉलेजमध्ये संपन्न झालेल्या तांत्रिक महोत्सवाचे उद्घाटन विश्वविद्या विकास मंडळाचे अध्यक्ष फैज इनामदार यांच्या हस्ते झाले.
सोलापूर जिल्हा दक्षिण तालुका येथील होटगी गावात असलेल्या मौलाना आझाद पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष अमिरुद्दीन शेख, सचिव नुराशा सय्यद, प्राचार्य सरफराज शेख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना फेज इनामदार म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचे ध्येय निश्चित केले पाहिजे आपली आवड काय आहे आणि आपली क्षमता भविष्यात आपण काय करू इच्छितो याचा विचार करून ठेवावा जेणेकरून भविष्यात आपल्याला ती पर्सनॅलिटी उभी करता येईल. मेहनत आणि सातत्य तसेच आत्मविश्वास त्याच्या बळावर कोणते येत आहे ध्येय साध्य करता येते असे ते म्हणाले.
आपल्या प्रास्ताविक मध्ये सर्फराज शेख बोलताना म्हणाले की तंत्रज्ञान केवळ दैनंदिन जीवन सुलभ करत नाही तर विविध क्षेत्रातील प्रगतीस चालना देते जसे ई-मेल व्हिडिओ कॉलिंग सोशल मीडिया च्या माध्यमातून लोकांशी आपण सहज संपर्क साधू शकतो. ई लर्निंग प्लॅटफॉर्म आणि डिजिटल साउंड साधनांमुळे नवीन संधी निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना सरफराज शेख यांनी केले तर आभार प्राध्यापक अमरीन यांनी मांडले तसेच सूत्रसंचालन अतिया यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आसमा तांबोळी शिवराज हरवले निखिल दुधगी बसवराज भूषण हर्षद शेख जुनेद शेख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले.
फोटो ओळी – डावीकडून सचिव सय्यद, अध्यक्ष मलंग शेख, पाहुणे फैज इनामदार, प्राचार्य डॉ. सरफराज नजीर शेख, एचओडी सौ. अमरीन शेख



























