मंगळवेढा : नंदूर येथे बेकायदा वाळू वाहतूक करणारा टेम्पो महसूलच्या कर्मचार्यांनी पकडून 4 लाख 10 हजार रुपये किंमतीचा वाळू व टेम्पोसह मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी कैलास शिंदे हे मंडळाधिकारी असून दि.7 जानेवारी रोजी रात्री 11.45 वाजता नंदूर फाटा येथे महसूल पथक गस्त घालीत असताना एम.एच.14 बी.जे.0285 हा टेम्पो दोन ब्रास वाळू वाहतूक करताना या पथकास मिळून आला. या दरम्यान चालकाकडे वाळू वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगीतले. यावेली टेम्पो चालकाने पथकाची नजर चुकवून अंधारात पळून गेला. त्याचा पथकाने पाठलाग केला असता तो मिळून आला नसल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार मनोज खंडागळे हे करीत आहेत.
फोटो ओळी
बेकायदा वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलीसांनी जप्त करुन लावल्याचे छायाचित्रात दिसत आहे.


















