सोलापूर – जुळे सोलापूर येथील किड्स वर्ल्ड स्कूलचे 10 वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व जल्लोषात हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये पार पडले. किड्स वर्ल्ड स्कूलचे यावर्षी दहावे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूरचे दिलीप कोल्हे. (माझी उपमहापौर सोलापूर) यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास डॉ. सिद्धांत गांधी, संस्थेचे प्रमुख सुभाष कदम व अशोक पाटील, सर्व संस्थापक मित्र हरीश शिंदे, विजेंद्र शिखरे व सचिन कांबळे, डॉ. वलगेवलगे, हनुमंत चव्हान व प्राजक्ता चव्हाण, गणेश गोटे व चैताली गोटे, संभाजी घाडगे व वर्षा घाडगे, गणेश बुरगुटे व कविता बुरगुटे, इलियाज शेख व जुहेरीया शेख, बाळासाहेब चव्हाण व स्वाती चव्हाण, अश्वराज वाघ व स्वाती वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्यमने झाली. विविध गाण्यावर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून स्मृती मंदिर दणाणून सोडले. भक्तीपर प्रात्यक्षिके व शिवशंभु चा छावा या सुपरहिट चित्रपटातील गाण्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या कलेचा आनंद मनमुराद लुटला व चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही प्रत्येकच गाण्यावर खूपच बहारदार नृत्याविष्कार सादर केला. पालकांनीही प्रत्येक गाण्यावर प्रचंड टाळ्यांच्या गजरानी दाद दिली. विशेष म्हणजे मराठी हास्य जत्रा कलाकार अरुण कदम यांनी आपली कला सादर करून या कार्यक्रमास रंगत आणली.
पालकांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे हुतात्मा स्मृती मंदिर खचाखच भरले व बहुतांश पालकांना उभे राहूनच कार्यक्रम पहावा लागला. या कार्यक्रमासाठी स्कूलच्या प्रिन्सिपल स्नेहा पाटील व सर्व टीचर्स यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर संस्थेचे संस्थापक संदीप पाटील यांनी संस्थे च्या प्रगतीची माहिती दिली. आभार प्रदर्शन प्रिया कौशिक व नम्रता यांनी केले.

















