सोलापूर – स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी अट्टल घरफोडी करणारा आरोपी जेरबंद करत एकुण ३ लाख ४४ हजारांचे सोन्या चांदीचे दागीने हस्तगत केले.
पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांनी गुन्हे प्रतिबंध करणेबाबत व वरीष्ठ पोलीस निरीक्षक, संजय जगताप यांना सुचना दिल्याने पोलीस निरीक्षक, संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्हे उघडकीस आणने कामी मार्गदर्शन व सुचना दिले होते.
सहा पोलीस निरीक्षक, विजय शिंदे व त्यांचे पथक बार्शी पोलीस ठाणे हद्धीमध्ये मालाविषयी गुन्हयातील आरोपीचे शोधकामी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिवाजी चौक आडत लाईन निलंगा ता. निलंगा जि. लातूर येथे राहणारा आरोपी नामे अक्षय मारोती शिंदे हा बार्शी शहरातील रेल्वे स्टेशन येथे आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्यानंतर लागलीच सरकारी वाहनासह बार्शी रेल्वे स्टेशन येथे जावून नमूद आरोपी याचा शोध घेतला असता तो मिळून आला त्यास नाव गाव विचारता त्यांने आपले नाव अक्षय मारोती शिंदे वय २५ वर्षे रा. शिवाजी चौक आडत लाईन निलंगा ता. निलंगा जि. लातूर असे असल्याचे सांगितले आहे.
ताब्यात घेतलेला इसम अक्षय मारोती शिंदे यास विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्याने बार्शी शहर पोलीस ठाणे गु. र. क ५४९/२५ कलम ३३१ (३), ३०५ बी. एन. एस. या गुन्हयाची कबुली दिली आहे. तसेच त्यास अधिक विश्वासात घेता त्याने मी व माझा साथीदार याचेसह बार्शी शहर पोलीस ठाणे गु. र. क ८९२/२५ कलम ३३१(३) ३३१ (४), ३०५ (अ) बी. एन. एस, बार्शी शहर पोलीस ठाणे गु. र. क ५४९ / २५ कलम ३३१(३),३०५ बी. एन. एस., बार्शी शहर पोलीस ठाणे गु. र. क ६०१/२५ कलम ३३१(३),३३१ (४),३०५ (अ) बी. एन. एस. ३), बार्शी शहर पोलीस ठाणे गु. र. क १००४/२५ कलम ३३१(३),३०५ बी. एन. एस.. हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
गुन्हयातील नमुद आरोपीकडून एकुण २१ ग्रॅम सोन्याचे दागीने व २० ग्रॅम चांदीचे दागीने असा एकुण ३,४४,०००/- रूपये (चालु बाजार भावा प्रमाणे) इतक्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, व वरीष्ठ पोलीस निरीक्षक, संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक, विजय शिंदे, व पथकातील श्रेणी पोलीस उप-निरीक्षक / श्रीकांत गायकवाड, पोहेकों / सलीम बागवान, रवी माने, अश्विनी गोटे, अनवर अत्तार, विनायक घोरपडे, मनोज राठोड, सूरज रामगुडे, अर्चना मस्के, दिपाली जाधव यांनी बजावली.
























