सोलापूर – प्रभाग क्रमांक १३ मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा, सुनिता कामठी आणि अंबिका चौगुले यांच्या प्रचारार्थ शनीवारी बापूजी नगर येथे कॉर्नर बैठक घेण्यात आली. या बैठकीत विकासाच्या मुद्द्यावर भाजप पक्षाला पाठबळ देण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले. यावेळी मतदारांनीही भाजप उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे शहरात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना होणार असल्याने त्यांच्यामध्ये उत्साही वातावरण दिसून आले. विकासाच्या मुद्द्यावर आणि सोलापूरच्या मूलभूत गरजांवर, आयटी पार्क आणि पाणी प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने भाजपाच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. या कॉर्नर बैठकीत शंकर चौगुले आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

















