अक्कलकोट – सौरभ काटगावकर व सहकाऱ्यानी सादर केलेल्या अभंग गौळण भक्ती संगीतानी स्वामी भक्त अक्कलकोटवासीयाची मने जिंकली .
वटवृक्षस्वामी महाराज मंदिर येथे स्वामी महाराजाच्या १४८ व्या पुण्यतिथीनिमित्य आयोजित धर्मसंभिर्तन महोत्सवात ९वे पुष्प गुंफताना सौरभ काटगावकर व सहकाऱ्यांनी स्वामी चरणी भक्ती संगीत सेवा सादर केली .
प्रारंभी वंदिन आयोध्येचा राम , पालखीच्या संगे आज मन माजे , दत्तगुरु दत्तगुरु , आमुचा कैवारी हनुमान ;माझे माहेर पंढरी ;कानडा राजा पंढरीचा , कन्नड भाषिकासाठी भाग्यदा लक्ष्मी बारम्मा , गुरु हा संत कुळीचा राजा ;गुरु हा प्राण विसावा माझा ‘पद्मनाभा नारायणा ;श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ , नामजप आदि रसिक श्रोत्या च्या ओठावरील अभंग गीते सादर करुन रासिक श्रोत्यांची वाहवा मिळवली .
प्रारंभी सौरभ काटगावकर यांचा परिचय ओंकार पाठक यांनी करुन दिला . गायक सौरभ काटगावकर ‘ ‘तबला नितीन दिवाकर ;मृदृगं पखवाज;ज्ञानेश्र्वर दुधाने ‘ ओंकार पाठक ( हार्मोनियम ) अक्षय सरदेशमुख ( ताल) आदि कलाकारांचा वटवृक्षस्वामी महाराज देवस्थान मंदिर सामती चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . याप्रसंगी सचिव आत्माराम घाटगे विश्वत महेश गोगी उज्वलाताई सरदेशमुख प्रथमेश इंगळे , प्रा शिवशरण अचलेर , प्रसाद पाटील , श्रीशैल गंवडी , मनोज जाधव ‘ ,स्वामी लोणारी : काशीनाथ इंडे , बाळासाहेब कुलकर्णी राजु भोसले ‘ महादेव तेली , लक्ष्मण पाटील , प्रसाद सोनार , अशोक कडगंची , ‘ , संजय पवार ‘ रमेश शिंदे ‘ सुनिल पवार , बाळासाहेब एकबोटे ‘ मडोळा घिवारे . निगुताई हिंडोळे जाजू मनोज देगावकर ‘ ज्योती दिपक जरीपटके प्रसाद पाटील आदि बहुसंख्य स्वामी भक्त उपस्थित होते .
























