बार्शी – बार्शी शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (अजित पवार गट) यांनी आज बार्शी नगरपरिषद बार्शी येथे गेली दहा ते बारा दिवस झाले पाणी येत नसल्याने आणि खराब पाण्याबाबत मुख्याधिकारी बार्शी नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आले आणि सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर मुख्याधिकारी यांची सकारात्मक चर्चा झाली.
तसेच बार्शी शहरात रस्त्याला पडलेले खड्डे पण लवकरात लवकर बुजवण्यात यावे, अशी मागणी देखील करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विक्रम सावळे, सुरज ढमढेरे, संताजी सावंत, बापू चोबे, डी.एम. बांगर, जयंत देशमुख, नाना झाल्टे, युवक जिल्हा सरचिटणीस नवाज मुलाणी, अतिश गायकवाड, बार्शी शहर अध्यक्ष मुजम्मील पठाण, युवक शहर संघटक फैजान सौदागर, रेहान पिंजारी, आदी मान्यवर उपस्थित होते.