आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये देशाचे सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) ८.२ टक्के नोंदवला गेला आहे. मात्र याच वर्षाच्या चौथ्या तिमाहीतील जीडीपी किंचित घसरून ७.८ टक्के झाला आहे. देशात सरकारकडून वस्तूनिर्मितीला चालना दिली गेल्यामुळे २०२३-२४ अखेर जीडीपी वधारला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यायलायने शुक्रवारी ही माहिती जाहीर केली.
आर्थिक विकास अधिक प्रमाणात झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ३.५ लाख कोटी डॉलर झाली असून येत्या काही वर्षांत ती पाच लाख कोटी डॉलर होईल, असा विश्वास अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. २०२२-२३ या मागील आर्थिक वर्षात जीडीपी ७ टक्के नोंदवला गेला होता. त्या वर्षी जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ या काळात ६.२ टक्के जीडीपी होता. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चीनने ५.३ टक्के जीडीपीची नोंद केली आहे.
नाममात्र (नॉमिनल) जीडीपी हा विद्यमान किंमतींच्या आधारे मोजला जातो. मार्च महिन्यात संपलेल्या चौथ्या तिमाहीअखेर नॉमिनल जीडीपी ७८.२८ लाख कोटी रुपये झाला. वर्षभरापूर्वी हा जीडीपी ७१.२३ लाख कोटी रुपये होता. जानेवारी ते मार्च २०२४ या तिमाहीत नॉमिनल जीडीपीत ९.९ टक्के वाढ झाली आहे.
वास्तविक (रिअल) जीडीपी
– स्थिर किंमतींवर आधारित जीडीपी म्हणजेच रिअल जीडीपी २०२३-२४ या आर्थिक वर्षात १७३.८२ लाख कोटी रुपयांवर जाईल.
– वर्ष २०२२-२३मध्ये १६०.७१ लाख कोटी रुपये रिअल जीडीपीचा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने वर्तवला होता.
चौथ्या तिमाहीतील रिअल ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड
क्षेत्र २०२३-२४ २०२२-२३
तिमाहीनिहाय जीडीपी
तिमाही जीडीपी (टक्के)
एप्रिल ते जून २०२३ ८.२
जुलै ते सप्टेंबर २०२३ ८.१
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ ८.६
जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ ७.८