मोहोळ – तालुक्यात सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या विमलताई खताळ यांना जि प अध्यक्ष किंवा सभापतीचा बहुमान देण्याचा निर्णय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतबैठक करून त्यांच्याशी विचार विनिमय करून ते सांगतील त्या पद्धतीनेच होईल .असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी लांबोटी येथे केले .
.लांबोटी येथील हॉटेल जयशंकर येथील नूतन जि प सदस्य श्रीमती विमल खताळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ते आले होते . यावेळी भाजपाच्या कामती जि प गटाच्या विजयी उमेदवार विमल खताळ, नरखेड जि. प चे विजयी उमेदवार लखन शिंदे या दोघांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी याप्रसगी अक्षय खताळ ,मोहोळचे स्वीकृत नगरसेवकसुशील क्षीरसागरआदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी हे विधान केले .भाजपाच्या नेतृत्वावर जनतेच विश्वास आहे खास करून ग्रामीण भागातली जनता भाजपाच्या पाठीशी आहे या निकालने दाखवून दिले आहे .
आपल्या भागाचा विकास करावयाचा असेल तर भाजपा बरोबर जाणे आवश्यक आहे हे जनतेने ओळखले आहे . त्यामुळे भाजपाच्या उमेदवाराला चांगल्या मतांनी निवडून दिले आहे असे सांगत विरोधकांनी केलेल्या टीकाटिपणीला जनतेने स्पष्टपणे नाकारल्याचे दिसून येत आहेअसे ते म्हणाले . पुढे बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले की ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे . मी विमलताई खताळ यांचे खास अभिनंदन करत आहे . त्यांनी केलेल्या लोकोपयोगी कामामुळे त्यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला आहे . म्हणजेच लोक चांगली कामे लक्षात ठेवून अशा उमेदवारांना विजयी करत असतात हे यातून सिद्ध झाले आहे .
याबाबत पत्रकारांनी यापूर्वी मोहोळ तालुक्याला जिल्हाध्यक्ष पदमिळाले नाही तीन वेळा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद मिळाले परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर मोहोळ तालुक्याची ५० वर्षांपासून वर्णी लागलेली नाही . विमलताई खताळ या सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत त्यामुळे त्यांना जिल्हा अध्यक्ष पद मिळणार काय असे विचारले असता सध्याच्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातून ३८ सदस्य कमळ चिन्हावर निवडून आले आहेत . त्याचा आम्ही आनंद उत्सव करणार आहोत .
मीटींगच्या माध्यमातून सगळ्यांचा सत्कार करणार आहोत . त्यानंतरच्या मीटिंगमध्ये कोण अध्यक्ष उपाध्यक्ष कोण विषय समिती सभापती याबाबतची चर्चा होईल . त्यानंतरचा निर्णय राज्याचेप्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेत असतात त्यानुसार त्यांच्या निर्णयानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण होईल असे ते म्हणाले .


























