मागील काही दिवसांपूर्वी मावळमधील शरद पवार गटाचे नेते मदन बाफना यांनी राष्ट्रवादी पक्षातील फुटीवरुन चांगलेच खडेबोल सुनावले होते मात्र, आता मावळचे आमदार आणि अजित पवारांचे समर्थक सुनील शेळके यांनी मदन बाफना यांना थेट इशारा दिला आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे अनेक तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये खटके उडताना पाहायला मिळत आहेत. त्यातच मावळ तालुक्यातील आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार मदन बाफना यांच्यात आपापल्या नेत्यांवरून खडांजगी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात मदन बाफना यांनी केलेल्या टीकेला सुनील शेळके यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे. ” बाफना साहेब माझ्या नेत्याबद्दल बोलू नका, नाहीतर तुमचा हिशेब मी काढेल, अशी तंबीच सुनील शेळके यांनी मदन बाफना यांना दिली आहे. मावळ तालुक्यात अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. त्यात सुनील शेळके यांनी ही तंबी दिली आहे.

मदन बाफना यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, शरद पवार आमचे नेते आहेत. आजकाल बापाला बाप म्हणण्याची संस्कृती राहिलेली नाही. बापाला विसरायचं नसतं. संस्कार सगळ्यांनी सोडले आहेत. असे संस्कार सोडलेल्या लोकांना मी बोलून दाखवणारं असे मदन बाफना म्हणाले होते.
यावेळी सुनील शेळके म्हणाले की, मला बाफना साहेबांना विनंती करायची आहे की, तुम्हाला देखील मावळच्या माय बाप जनतेने डोक्यावर घेतलं. तुमचा काळ हा वेगळा होता आमचा काळ वेगळा आहे. तुमच्या पिढीत आणि आमच्या पिढीत फरक आहे. बाफना साहेब वडिलकीच्या नात्याने आम्हाला आशीर्वाद द्या. आमची भूमिका तुम्हाला पटली नसेल तर तुम्ही तुमची भूमिका घ्या. परंतु दादांना, सुनील शेळके किंवा राष्ट्रवादी पक्षाला चुकीच्या पद्धतीने बोलू नका. चुकीचं स्टेटमेंट करू नका.
आमच्या नेत्याचा अपमान जर तुम्ही केला तर जशास तसं उत्तर तुम्हाला देणार. आपण माझ्या नेत्याच्या बद्दल अपशब्द काढू नका. मागच्या दोन महिन्यांपूर्वी सुनील शेळके खूप चांगला आमदार आहे. खूप चांगली कामे करतो असे म्हणणारा माणूस दोन महिन्यात अचानक का बदलले मला माहित नाही. म्हणून बाफना साहेब आपण वडिलकीच्या नात्याने आम्हाला आशीर्वाद देत रहा. तुमच्या काही अडचणी असतील तर सांगा. परंतु तुम्ही पुन्हा जर काही आमच्या नेत्याबद्दल बोलले तर मी तुमचा हिशोब काढणार एवढं माझं तुम्हाला सांगणं आहे. आम्ही तुमचा मान ठेवतो तुम्ही.आमच्या नेत्याचा मान ठेवा एवढंच तुम्हाला सांगणं आहे. असे म्हणत आमदार सुनिल शेळके यांनी माजी आमदार मदन बाफना यांना इशारा दिला आहे.