त भा प्रतिनिधी जाफराबाद
आज दिनांक 2 सप्टेंबर 2024 सोमवार रोजी न्यू हायस्कूलचे माजी विद्यार्थी ज्यांनी मागच्या काही दिवसात विविध पदांना गवसणी घातली त्यामध्ये विशेष म्हणजे गणेश कचरुबा वाघमारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली, त्याआधी त्यांनी कर सल्लागार मंत्रालय मुंबई आणि तलाठी हिंगोली या पदावर सुद्धा काम केलेलं आहे. त्यानंतर विजय अशोक हाटकिळे यांची नगरपरिषद ऑडिटर आणि अकाउंटंट अशा दोन्ही पदावर निवड झालेली, शिवहारी ठाकरे यांची आरोग्य विभागामध्ये नर्सिंग ऑफिसर त्याआधी त्यांनी आरोग्य सेवक म्हणून काही दिवस काम बघितलेले आहे.
त्यानंतर आपला संसार करत अभ्यास करून नासिक येथे आरोग्य सेविका म्हणून ज्यांची निवड झाली त्या म्हणजे सौ. रुक्मिणी भगवान पवार (पूर्वाश्रमीच्या रुक्मिणी गणेश परिहार) कोनड बु. या चौघांनीही अतिशय मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने आपल्या अभ्यासात सातत्य राखत हे यश संपादन केलं त्यांचा न्यू हायस्कूल, वरुड घायवाटच्या वतीने सत्कार करण्यात आला.
उपस्थित वरील सर्व सत्कारमूर्तींचे वरुड नगरीचे सरपंच श्री. विलास आप्पा शिंदे, शालेय समिती अध्यक्ष श्री. संतोष पाटील ठाकरे, शालेय समिती सदस्य श्री. सखारामकाका सातव, श्री. रमेश पाटील गव्हाड, डाॅ. अशोक परीहार, श्री. संजय साळवे, श्री.जितेंद्र वाघमारे श्री.साईनाथ राजे, श्री.गणेश शेळके, श्री.सुनील शेळके, श्री. भरत सुळ, श्री. दत्ता हांडगे, श्री. समाधान काकडे, श्री. राजेंद्र चिडे श्री.गणेश लोखंडे,
तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. बल्लाळ, शिक्षक सर्वश्री, पी. बी. मलिये, आर. डी. गोसावी, ए. एस. भोपळे, आर. एस. गाढवे, श्रीमती ए.सी. सुरडकर, एस. डी. वैराळ, ई. ए. शेवत्रे, जी. एम. कन्नेवार, एन. ई. धंदर, पी. एस. घोडके, बी. के. भोकरे, आर आर देशमुख, जी. डी. गोसावी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तींनी आपल्या सत्काराला उत्तर देताना, विद्यार्थ्यांनी जर मनी उच्च ध्येय ठेवले, सतत परिश्रम करण्याची तयारी ठेवली, त्या त्या क्षेत्रातील तज्ञांची मार्गदर्शन घेतले, आपल्या सोबत चांगले मित्रांची संगत ठेवली, व आपली गुरुजन आणि आई वडील यांनी सांगितलेल्या मार्गाने चालत राहिले तर निश्चितच जीवनात इच्छिलेली ध्येयप्राप्ती पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांमधून कुमारी आरती वाघमारे आणि सोहम करडेल या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन सत्कारमूर्तींचे आभार मानले.
तर सरपंच विलास आप्पा शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, तुम्हाला जिथे अडचण येईल ते मला आवाज द्या पण आई-वडिलांचे स्वप्न साकारताना मागे फिरू नका.
अध्यक्षीय समारोपामध्ये श्री. संतोष ठाकरे यांनी आज आपल्यासमोर हे यशवंत एक रोल मॉडेल म्हणून उभे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्हीही तुमच्या जीवनात यश प्राप्ती करू शकता त्यासाठी प्रचंड मेहनत करा. अशा स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस डी वैराळ यांनी केले तर आभार पी. एस. घोडके यांनी मानले.