परंडा – लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आणि समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याच्या उद्देशाने, नगरपरिषद कार्यालयात दि . ६ जानेवारी रोजी ‘पत्रकार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या शुभ हस्ते दैनिक तरुण भारत व मराठवाडा नेता तालुका प्रतिनिधी आप्पासाहेब शिंदे यांच्यासह शहरातील पत्रकारांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने वाजिद भाई दखनी, नगरसेवक बच्चन गायकवाड, माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे, इरफान शेख, बब्बू जिनेरी, अमजद मुजावर, राजकुमार माने, मदन दिक्षीत , दिलीप रणभोर , खय्युम तुटके , दत्ता महाराज रणभोर ॲड संदिप शेळके , तनवीर मुजावर , कदीर जिनेरी , वामन शिंदे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नगरपरिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही पत्रकारांच्या साहसी आणि कर्तव्यदक्ष वृत्तीचे विशेष कौतुक केले.
या गौरवाने सर्वच पत्रकार भारावले नगराध्यक्ष जाकीर सौदागर व त्यांच्या टिमने दाखवलेल्या या आपुलकीबद्दल उपस्थित पत्रकारांनी नगरपरिषद बद्ल आभार व्यक्त केले.























