सोलापूर : करकंब ता.पंढरपूर येथील रोजा गल्लीत एका ठिकाणी पंढरपूर पोलीस पथकाने अचानक धाड टाकून सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून १४आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की शनिवार दिनांक ११ऑक्टोबर रोजी ५ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर करकंब येथील एका खोलीत जुगार खेळणाऱ्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत १४आरोपींकडून ४१,४३० रुपये रोख रक्कम,७ दुचाकी वाहने,१४ मोबाईल मिळून सुमारे पाच लाख ५१ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईवेळी विजय बाबुराव वंजारी यांच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये अवैध विक्री होणारा दारू साठा सापडला.यामध्ये दारूचे ६बॉक्स १२बाटल्या (किंमत २३,६१६रु.) सखु संत्रा ५बॉक्स १२बाटल्या (किंमत १९,७७६रु.) सिक्री संत्रा ७ बॉक्स,२४ बाटल्या ( किंमत २८,८००रु.) असा एकूण ७२,१९२ रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आल्याचे पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सांगितले.रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...