मंगळवेढा – येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे सुवर्ण महोत्सवी ५० वे वर्ष विविध सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमातून साजरा होणार असल्याचे स्वागताध्यक्ष आ. समाधान आवताडे यांनी सांगितले.
दि. ११ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत शिवप्रेमी चौकातील शिवतीर्थावर होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती राहणार आहे.
दि. ११ रोजी सायं ५ वाजता भगवी पदयात्रा, सायं ६ वाजता शिवमंचाचे पूजन, सायं ७ वाजता संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हस्ते व आ. समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवमुर्तीची प्रतिष्ठापना होणार असुन हत्तीकडून छत्रपतींना मानवंदना देण्यात येणार आहे.
दि.१२ रोजी नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. १३ रोजी ह.भ.प. गोविंद महाराज गायकवाड, यांचे प्रबोधनात्मक सोंगी भारूड होणार आहे.
दि.१४ फेब्रुवारी रोजी स्वराजरक्षक संभाजी महाराज फेम शिवशाहीर संतोष साळुंखे, यांचा स्फूतीगीते व पोवाड्याचा कार्यक्रम होणार असून
दि.१५ रोजी लोककवी प्रशांत मोरे मुंबई व मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेचे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत, अकोला यांचा काव्यमय समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.
दि १६ रोजी संगीत सम्राट फेम रामानंद उगले यांचा महाराष्ट्राची लोकगाणी हा लोकगीतांचा कार्यक्रम तर दि.१७ रोजी हभप पुरषोत्तम महाराज पाटील यांचे किर्तन होणार दि.१८ रोजी स्वराज्याचे आख्यान दि १९ रोजी सुवर्ण महोत्सवी वर्षी शिवजयंतीदिनी सकाळी १० वाजता महिलांच्या भव्य भगवा फेटा रॅलीत स्वराज्य रक्षक संभाजी मालिका फेम प्रतीक्षा लोणकर उपस्थित राहणार आहेत.
तर दुपारी ३ वाजता मंगळवेढा शहरातून विविध वांद्यासहित शिवमुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी बँड पथक ढोल पथक बँजो पथक जगदंबा लेझीम पथक, अर्जुन हलगी, ऐतिहासिक मावळे, सुरसनई पथक, मनोरंजन कार्टून,
शिवमर्दानी खेळ, उंट, घोडे असे आकर्षण ठरणार आहे. उत्सव कालावधीत शेताकऱ्यांना पीक लागवड कृषी मार्गदर्शन शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, अन्नदान, फळे वाटप असे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


























