सोलापूर – राज्यातील पाणी व स्वच्छता कर्मचारी राज्य कृती समितीच्या वतीने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री मेघना साकोरे यांना निवेदन देण्यात आले. पाणी पुरवठा व स्नच्छता विभागातील कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्या साठी मुंबई येथे प्रधान सचिव यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे. कर्मचारी यांचे मानधन व प्रश्न निकाली निघे पर्यंत काळ्या फिती लावून असहकार आंदोलनावर कृती समिती ठाम आहे.
कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत, उपाध्यक्ष बंडू हिवरे , नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांनी सोमवारी हैद्राबाद हाऊस येथे प्रधान सचिव पराग जैन यांची भेट घेतली.
राज्य कृती समितीची पदाधिकारी यांची बैठक रवी भवन येथे घेण्यात आली. या बैठकीत कृती समिती आंदोलनावर ठाम आहे. जो पर्यंत वेतन खातेवर जमा होत नाही तो पर्यंत काळ्या फिती लावून असहकार आंदोलन सुरू ठेवणेवर कर्मचारी यांनी एकमुखी शिक्कामोर्तब केले.
…
पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे प्रश्नावर शासन सकारात्मक –
………………..
राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांचे प्रश्न सोडविणे साठी शासन सकारात्मक आहे. जलजीवन मिशन साठी निधी नाही. स्वच्छ भारत मिशन साठी उपलब्ध असलेले निधीतून वेकन अदा करणे, आकृतीबंध व कायम करणेचे प्रश्नाबाबत शासन सकारात्मक असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

















