अक्कलकोट – नगर परिषद परिसरातील जनतेचा विश्वास जपत, सलग पाचव्यांदा निवडून येणे ही महेश इंगळे यांच्या कार्य कर्तुत्वाची पोच आहे. आपल्या सेवाभावी कार्याने महेश मालक इंगळे यांनी विकास, सेवा आणि प्रामाणिकपणाचा आदर्श आपण घालून दिला आहे. या माध्यमातून महेश मालक इंगळे यांचे नेतृत्व अक्कलकोट शहराच्या प्रगतीस नवी दिशा देण्यास सक्षम असल्याचे मनोगत
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील सामाजिक कार्यकर्त्या अरुणा मगदूम यांनी व्यक्त केले. आज नुकतेच सामाजिक कार्यकर्त्या अरुणा मगदूम, उद्योजक सागर मगदूम यांनी आपल्या कुटूंबियांसमवेत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून विजय झाल्याबद्दल नगरसेवक महेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुष्पहार देवून
अरुणा मगदूम यांनी सत्कार केला. तसेच यावेळी मंदीर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनीही अरुणा मगदूम, उद्योजक सागर मगदूम यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी अरुणा मगदूम बोलत होत्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी,
गिरीश पवार, प्रसाद सोनार, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – अरुणा मगदूम, सागर मगदूम यांनी वटवृक्ष मंदिरात महेश इंगळे यांचा सत्कार करताना छायाचित्रात दिसत आहे.

















