जेऊर – करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व ग्रामपंचायत पांडे -धायखिंडी- खांबेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास…ग्राम व शहर विकास…हे ब्रीदवाक्य घेऊन विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मौजे धायखिंडी येथे करण्यात आले आहे .
या ठिकाणी महिलांच्या सबलीकरणासाठी मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पारंपरिक वेशभूषेमध्ये लेझीम नृत्याने करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला भाजप प्रदेश उपाध्यक्ष सौ.रश्मी दीदी बागल यांनी केले. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी आपल्या मुला मुलींकडे लक्ष देऊन संस्कारक्षम पिढी घडविणे ही काळाची गरज आहे असे गौरव उद्गार काढले.
संस्कारक्षम पिढी हीच आपली अनमोल संपत्ती आहे. तसेच प्रत्येक महिलेने आपल्या मुलांना प्रत्येक टप्प्यावर योग्य ते मार्गदर्शन करणे व त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करावी असे सांगितले. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत संक्रमण करतो त्याप्रमाणे तुमच्या भावी आयुष्यात चांगले सकारात्मक विचाराचे संक्रमण घडावे तिळगुळासारखा स्नेह तुमच्या आमच्या सर्वांच्यात राहो अशी सदिच्छा व्यक्त केली.
तसेच यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉक्टर मीरा रामनवमीवाले यांनी रश्मी दिदी हे उत्तुंग सुशिक्षित आणि सृजनशील व्यक्तिमत्व निर्माण होत असताना सर्व महिलांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे भावनात्मक आवाहन केले. तसेच अंगणवाडी सेविका सौ. पारेकर मॅडम यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे माहेरची पैठणी या कार्यक्रमात उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ द्वारे पाच मानाच्या माहेरच्या पैठण्या देण्यात आल्या. तसेच त्यांच्या प्रतिक्रिया ही जाणून घेतल्या. तसेच उपस्थित प्रत्येक महिलेला संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे वाण देण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून विद्या विकास मंडळाच्या विश्वस्त सौ. जयश्रीताई घुमरे उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए.पी. माने,सौ. कोमलताई घुमरे, सौ.अनुराधा साळुंखे, धायखिंडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच शितलताई अनारसे, माजी सरपंच सौ अनिता मोटे जि.प.च्या माजी सभापती व करंजे गावच्या पोलीस पाटील सौ. सारिका ताई ठोसर, सौ.स्वातीताई माने, जि. प.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वृषाली सोरटे, सौ. भोसले मॅडम, ग्रामपंचायत सदस्य दादा वायकुळे व त्यांचे सर्व सहकारी ग्रामसेवक गणपत नाईकवडे राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख व त्यांचे सहकारी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक वृंद पांडे, धायखिंडी व खांबेवाडी गावचे प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ,राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक,स्वयंसेविका जि. प.शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सौ. सुरेखा जाधव यांनी केले. तर आभार प्रा.सौ.मुक्ता काटवटे यांनी मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.सुजाता भोरे यांनी केले.


















