जेऊर – करमाळा पोलिसांनी करमाळा शहर व परिसरातील चोऱ्यावरती नियंत्रण व झालेल्या चोऱ्यांचा शोध तात्काळ लावण्याचा धडाका नवीन वर्षात ही सुरूच ठेवला आहे. पाच लाख अंशी हजाराच्या मोठ्या चोरीचा शोध चोवीस तासाच्या आत लावून सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. कालच्या चोरीत डोंबिवली येथून सुलोचना मच्छिंद्र लोहार नातुच्या लग्नाला वरकटणे ता करमाळा येथे आलेल्या असता लग्न कार्यक्रमानंर त्या त्यांचा भाचा बाबासाहेब नंदरगे करमाळा येथे मुक्कामी थांबल्या. दुसऱ्या दिवशी एसटी प्रवासात त्यांचेजवळील ५ तोळे वजनाचे गंठण व चांदीचा छल्ला गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी चोरला. त्यानंतर त्यांनी करमाळा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
करमाळा पोलिसांनी सर्व माहिती घेत तपासाची सूत्रे गतीने हलवली.
मिळालेल्या माहितीनुसार करमाळा बस स्टॅन्ड मधून पंढरपूर ते वाडा या गाडीत बसल्यानंतर तिकिटाचे पैसे देताना चोरट्यांनी दागिने पाहिले व गर्दीचा फायदा घेत गंठण व छल्ला चोरून नेला
करमाळा गुन्हे शाखेची धडक कारवाई
करमाळा गुन्हे शाखेत गुन्हा नोंद झाल्यानंतर लगेचच पोलिसांनी एसटी स्टँड वरील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारावरती आरोपीचा शोध सुरू केला त्यांना असे आढळून आले की आरोपी रविता भोसले व आशा पवार यांनी चोरी केली असावी व तात्काळ विविध क्लुप्त्या वापरून आरोपीला पकडण्यासाठी पथक रवाना झाले मोबाईल लोकेशनच्या आधारावरती अहिल्यानगर जिल्ह्यात आरोपी आढळून येत होते त्यांचा पाठलाग करत अखेर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात आरोपींना पकडले त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला व आपल्याकडील पाच तोळे सोन्याचे गंठण व चांदीचा छल्ला पोलिसांच्या ताब्यात दिला याची एकूण रक्कम पाच लाख 80 हजाराच्या आसपास होत होती या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आरकिले हे करत आहेत.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक,अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक,प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व करमाळा पोलीस निरीक्षक, रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस अजित उबाळे, मनिष पवार, वैभव ठेंगल, रविराज गटकुळ, अर्जुन गोसावी, भराटे,रंदिल, खोटे, न्हावकर तसेच सायबर शाखेचे व्यंकटेश मोरे हे करत आहेत.


















