बार्शी – शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या ४८ तासांच्या आत बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात यश आले असून या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बार्शी शहरातील टिळक चौक परिसरात राहणारे दशरथ शहाजी चव्हाण यांचा मुलगा श्रेयश दशरथ चव्हाण (वय १३ वर्षे) हा दि.२ जानेवारी रोजी कोणासही न सांगता घरातून निघून गेला होता. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी तात्काळ दखल घेत सपोनि झालटे व गुन्हे प्रकटीकरण पथकाला शोधकार्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सपोनि झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने बार्शी बसस्थानक, कुर्डुवाडी बसस्थानक तसेच पुणे रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासात मुलगा पुणे येथे गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने पुणे येथे तात्काळ शोध मोहीम
बेपत्ता मुलाचा शोध घेऊन त्याला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्त करताना बार्शी शहर पोलीस राबवून दि. ४ जानेवारी रोजी श्रेयश चव्हाण यास सुखरुप शोधून काढले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सदर अल्पवयीन मुलास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.























