सोनखेड पोलीस ठाणे हद्दीअंतर्गत येणाऱ्या अनिल बुद्रुक रा.पांगरी अवैद्य रेतीची वाहतूक करणे आणि
महादू नरंगले मटका चालविणे हा रा.शेवडी (बा.) ता.लोहा या दोघांवर हर्सूल मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजी नगर येथे स्थानबद्ध करण्यात आली असल्याची माहिती सोनखेड पोलिस ठाण्याचे सपोनि पांडुरंग माने यांनी दिली.
एम पी.डी.ए.कायद्या अंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तीच्या विघातक हालचालीवर प्रतिबंध घालण्याच्या महाराष्ट्र प्रतिबंध नजर कैद या कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीवर दोन व त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल करून सुद्धा तो सातत्याने गुन्हेगारी करीत असेल व त्या प्रवृत्तीपासून समाजात सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर अशा प्रवृत्तीच्या आरोपीचा संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी त्या गुन्ह्याचा अहवाल पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल करावा आणि त्यानंतर तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावा तो प्राप्त अहवाल आल्यानंतर त्या गुन्हेगाराची हकीकत जाणून घेऊन तो प्रस्ताव जिल्हा न्याय दंडाधिकारी हे मंजूर करतील त्यानंतर सदरील आरोपीला एका वर्षासाठी कारागृहात नजर कैदेत/स्थानबद्ध ठेवण्यात येईल त्या आरोपीला आपल्या जमिनीसाठीचा अर्ज हा केवळ उच्च न्यायालयामध्येच दाखल करता येईल अशी प्रस्तावना या एम.पी डी.ए.कायद्याची आहे.
या कार्यवाही मुळे रेती माफियाचे धाबे दनाणले असून जिल्ह्यात हि पहिलीच कार्यवाही असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे अजुन किती जण सोनखेड पोलिसांच्या रडारवर आहेत हे येणाऱ्या काळात पाहावे लागणार आहे.


























