सोलापूर – बाळे येथील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज. रा. चंडक प्रशालेतील विद्याथ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात कलाविष्कार सादर करून कौतुकाची थाप मिळवली.बाळे येथील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित स्वा. सै. स्व. तुळशीदास जाधव यांच्या पत्नी स्वा. से. स्व. जनाबाई जाधव 32 वा शिवणकला पुरस्कार वितरण समारंभ येथे मान्यवरांच्या उस्थितीत पार पडला.
हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ, संस्थेच्या सचिवा सौ.शिल्पाताई ठोकळ, अकलूज येथील ग्रीन फिंगर स्कूलचे चेअरमन नितीन देशमुख, नातेपुते येथील नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे संचालक अमरशील देशमुख,आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या
प्रारंभी व्यासपीठावर. संस्थेच्या मार्गदर्शिका ,आधारस्तंभ, माजी आमदार स्वर्गीय निर्मलाताई ठोकळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने शिवणकला व व्यावसायिक पुरस्कार संगीता सूर्यकांत गुंड यांना शिवणकला महिला पुरस्कार तर सुषमा सचिन चौधरी यांना शिवणकला व व्यावसायिक पुरस्कार देण्यात आला. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ होते.यांनी प्रारंभी प्रास्ताविकातून भाषणातून दादांच्या पत्नी स्व.जनाबाई जाधव यांच्या शिवणकलेच्या कलाकुसरीवर संसार चालविला. व आपल्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. स्त्रियांना गांधी टोपी शिवण्याचा रोजगार मिळवून दिला. जनाबाई जाधव यांच्या नावाने दिल्या जाणान्या शिवणकला पुरस्काराचा उद्देशत्यांनी विशद केला. प्रा.नितीन देशमुख यांनी व्यासपीठाचे पूजन केले. यंदाच्या वर्षी प्रशालेतील 360विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण केले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी
, हिंदी-मराठी गाण्यावर ताल धरत नृत्य करून पालक, प्रेक्षक, रसिकांकडून टाळ्यांची उत्स्फूर्तपणे दाद मिळविली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, रिमिक्स गाण्यावर, गवळणी, पारंपरिक संस्कृती जपणारे वारकरी नृत्य , कत्थक नृत्य, लोकगीते ,कोळीगीते रेट्रो सॉंग, गोंधळ गीत आदी प्रकारचे अशी गीते सादर केली..
मुख्याध्यापक मोहन घोडके, मधुकर मुळे,उदय जाधव, चंद्रकांत कुंटेलू सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती मुनीळी यानी आभार आशा ठोकळ यांनी मानले.

























