जाफ्राबाद / जालना – शहरातील व ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेला स्वस्त धान्य मिळावे यासाठी राज्य व केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून वाटप सुरु केले असले तरी या योजनेला पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधी च्या वरदहस्तामुळे तालुक्यातील वितरित होणारे गहू, तांदूळ व्यापाऱ्यांच्या घशात जात असल्याचे चित्र तालुक्यातील प्रत्येक गावात नजरेस पडत आहे. जाफ्राबाद तालुका स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुक्यातील वेगवेगळ्या विभागातील कर्तव्यहीन वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे मूलभूत सुविधापासून कोसो दूर लोटला जात असल्याचा तीव्र प्रतिक्रिया जनसामान्य उमटत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात राशन दुकानंदाराशी व्यापाऱ्यांचे संबंध असून लाभार्थ्यांच्या त्यांच्या घरात जाणारे स्वस्त धान्य व्यापाऱ्याच्या घशात जात आहे. भर दिवसा ढवळ्या या स्वस्त धान्याची वाहतूक कुणाच्या आशीर्वादाने होते हे एक ण उलघडणारे कोडे आहे.तालुक्यातील अनेक दुकानावर भावफलक लावण्यात आले नसून वेळ ही निश्चित कारण्यात आली नाही.
स्वस्त धान्य दुकान उघडन्याची वेळ 8 ते 12 व 4 ते 6 ही आहे. जाफ्राबाद तालुक्यात स्वस्त धान्यांची 112 दुकाने असून एकूण कार्ड संख्या 38383 असून, लाभार्थी संख्या 164627 आहे.
चौकटअंत्योदय योजना अंत्योदय योजेन अंतर्गत एकूण कार्ड संख्या 3935 व लाभार्थी 18658 इतकी असून या योजने अंतर्गत प्रति कार्ड 35 किलो प्रमाणे धान्य दिले जाते.
अन्न सुरक्षा योजना
या योजनेअंतर्गत एकूण कार्ड 28240 असून लाभार्थी संख्या 124773 व या योजनेतुन प्रति व्यक्ती 5 किलो धान्य दिले
जाते
Apl शेतकरी योजना
या योजनेअंतर्गत एकूण कार्ड सख्या 3089, लाभार्थी 11794 आहेत व या योजनेत प्रति व्यक्ती 170 दिले जातात
या योजनेअंतर्गत एकूण कार्ड 3119
लाभार्थी 9402 आहेत
जाफ्राबाद तालुक्यात दर महिना प्रमाणे सरासरी ऑक्टोंबर महिन्यात तांदूळ 4283 क्विंटल
ज्वारी 1440 क्विंटल
गहू 1462 क्विंटल अशी आहे पुरवठा बाबतित दर महिन्याला चढ उतार होऊ शकते असे म्हणणे पुरवठा विभागाचे म्हणणे आहे
जाफ्राबाद तालुका स्वस्त धान्य वाटपाबाबतीत जिल्हात अव्वल आहे. स्वस्त धान्य पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरु आहे.तालुक्याला आधार प्रामाणिक करण्याचे टारगेट 143841 व आम्ही केलेले 117453 व उर्वरित 26 हजार बाकी आहेत.सर्वात जास्त आधार प्रामाणिक करण, व धान्य वाटप जाफ्राबाद तालुक्यात होत आहे. स्वस्त धान्य वाटपासंदर्भात तक्रार आल्यास निश्चितपणे कार्यवाही करण्यात येईल श्रीमती एम. ए. चव्हाण पुरवठा निरीक्षक अधिकारी


























