सोलापूर – दि.20 डिसेंबर 2025 रोजी हनमगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील शेतकरी हूमनाबादकर यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना मांजरा सारखी दिसणारी दोन लहान पिल्ले आढळून आली. बिबट्याची पिल्ले असतील असा समज होता. तात्काळ सोलापूर वन विभागास कळविण्यात आले. वनविभाग रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होताच ही पिल्ले रानमांजर जातीची असल्याचे समजले. ऊसतोडणी सुरू असल्याने पिल्लांची आई घाबरून पळून गेली होती.
आता ही आई पिल्लांन कडे रात्रीच परतणार हा अंदाज घेऊन. पिल्ले ज्या ठिकाणी सापडली होती त्या परिसरातील ऊस न तोडता तसाच ठेवण्यात आला. वन विभागाने त्यापरिसरात ट्रप कॅमेरा लावला. त्या परिसरास वन विभागाने संरक्षण पुरविले. पिल्लांची आईला हाक मारणे सतत सुरू होते. रात्री 10.15 वाजता पिल्लांची आई दबक्या पावलांनी आली व एक एक करत आपल्या दोन्ही पिल्लांना ती सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली.
यासाठी सोलापूर वनविभाग उपवनसंरक्षक कुलराज सिंग, सहायक वनसंरक्षक अजित शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगर्डे, वनरक्षक श्रीशैल पाटील ,रेस्क्यूअर प्रविण जेऊरे, मुन्ना निरवने यांचे सहकार्य लाभले.


























