Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बार्शी नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता, २३ महायुतीच्या तर १९ उबाठाचे उमेदवार विजयी

तरुण भारतbyतरुण भारत
December 22, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – बार्शी नगरपरिषदेवर अखेर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने २३ जागा जिंकून सत्ता कायम राखली तर उबाठाचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी देखील १९ जागा जिंकून चांगलीच लढत दिली.

 नगराध्यक्षपदावर भारतीय जनता पार्टीच्या तेजस्विनी प्रशांत कथले यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या निर्मला बारबोले यांचा ४६८८ मतांनी पराभव करत सत्तेचे सिंहासन गाठले.

दि. २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर शासकीय धान्य गोदामात २१ प्रभागातील ४२ नगरसेवक आणि थेट नगराध्यक्षपदासाठी रविवारी २१ रोजी सकाळी दहा वाजलेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. १२ टेबलच्या माध्यमातून ११ फेऱ्यांमधून सर्व प्रभागांचे निकाल निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तैमूर मुलाणी आणि राज्य निवडणूक निरीक्षक विक्रमसिंह देशमुख यांनी घोषित केले.

सुरुवातीच्या प्रभागापासून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती ती कायम शेवटपर्यंत कायम ठेवली. इतर कोणत्याही प्रभागामध्ये शिवसेनेच्या उमेदवार निर्मला बारबोले यांना ही आघाडी तोडता आली नाही. विद्यमान नगरसेवक ऍड. महेश जगताप आणि रोहित लाकाळ या दोन नगरसेवकांना मात्र पराभवाला  सामोरे जावे लागले.

बार्शी शहरात सर्वात प्रतिष्ठेच्या झालेल्या प्रभाग ६ मधील माजी विरोधी पक्षनेते (उबाठा)  नागेश अक्कलकोटे यांच्या वार्डातील प्रतिष्ठेची लढत अक्कलकोटे यांनी ८६३ मतांनी एकतर्फी जिंकून दिली तर प्रभाग १९ मधून भाजपचे भारत पवार यांना केवळ सात मतांनी निसटता विजय मिळाला. प्रभाग ७ मधून २ हजार ५०० इतक्या सर्वात मोठ्या फरकाने भाजप शिवसेना युतीचे उमेदवार संदेश काकडे यांनी आपली जागा कायम राखली तर प्रभाग ७ मधून महायुतीच्या उमेदवार मीरा नाळे यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. प्रा. किरण देशमुख यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांनाही प्रभाग १८ मधून पराभवास सामोरे जावे लागले तर माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी देखील ऍड. सुशांत चव्हाण यांचा पराभव केला.

शहरातील २१ प्रभागातून सर्व २१ प्रभागाच्या सर्व मतदान केंद्रातून भाजपचे उमेदवार तेजस्विनी कथले यांना एकूण ३५ हजार ८७९ मते मिळाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्मला बारबोले यांना ३१ हजार १९१ मते मिळाली. भाजपच्या कथले यांनी बारबोले यांचा ४६८८ मतांनी पराभव केला.

 प्रभाग ६ मध्ये माजी नगराध्यक्ष कादर तांबोळी यांची कन्या व माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांची सून ताहिरा तांबोळी यांना शिवसेना उबाठाच्या सायरा मुल्ला यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. एमआयएमच्या नगराध्यक्षापदाच्या उमेदवार खाजाबी पठाण यांना ५६६ मतावर समाधान मानावे लागले तर काँग्रेसच्या जाकीराबी पठाण यांना केवळ ४६४ मध्ये मिळाली. अपक्ष सुप्रिया गुंड पाटील यांना ३७८ मते तर प्रहारच्या संजीवनी बारंगुळे यांना केवळ २५० मते मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी ‘नोटा’ला मात्र ३४१ मते मिळाली.

पक्षनिहाय विजयी उमेदवार व त्यांना पडलेली पुढील प्रमाणे कंसात : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजयी उमेदवार प्रभाग १ :  चांगुना जाधव (१७४८)  वसंत देवकर  (१६८१),  प्रभाग ३ : अनिकेत कारंडे (१५७१), प्रभाग ६ : नागेश अक्कलकोटे (२४३३), सायरा मुल्ला (२०७३), प्रभाग ८ : अमोल मांगडे (१९४६), प्रभाग ९ : भागवत ऊर्फ सचिन मांगडे (१२८४),  प्रभाग ११ : नवनाथ माळगे (१०३४), शांता नायकोजी (२३५७), प्रभाग १४ : राहूल कोंढारे (१७४२), प्रभाग १५ : महेदीमियाँ लांडगे (१७२०), रागिणी पाचपुते (१३७१),  प्रभाग १६ : आकाश राऊत : (१८११), शिला साळुंखे (१७४२), प्रभाग १९ : विद्या बंगाळे (१७३१), प्रभाग २० सरस्वती भानवसे  (२१८५), मुज्जमिल पठाण (१८८९), प्रभाग २१ : गोदावरी शिंदे (१४३०), कृष्णराज बारबोले (१४३७).

भाजप व शिवसेना युतीचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेले मते (कंसात) :  प्रभाग २ : अनिरुद्ध वाणी (१४८६), सुनीता ढोणे (१३८७), प्रभाग ३ : अर्चना बारस्कर (१५२०), प्रभाग ४ :  अमोल चव्हाण (१९६१), उर्मिला मोहिते (१९१४), प्रभाग ५ : शमा रिकीबे (१३६७), राजू घोंगाने (१३८२). प्रभाग सात संदेश काकडे (३३६७). प्रभाग ८ :  सुजाता मस्के (१७७०). प्रभाग नो आबेदा तांबोळी (१३७६).. प्रभाग १० :  स्वप्निल उघडे (१६३७), उर्मिला मुळे (१७४३). प्रभाग १२ :  भागीरथी त्रिंबके (१५७०), संतोष बारंगुळे (१७०३). प्रभाग तेरा फर्जना जलसे (२१४४), दीपक राऊत (२३८८). प्रभाग १७ : चंद्रकला कांबळे (१८१९),  विजय चव्हाण (१८६२). प्रभाग १८ :  रोहित पाटील (१६०९), कांचन मोहिते (१३७८). प्रभाग १९ : भारत पवार (१५२४).

 या निवडणुकीत मागील वेळेचे महायुतीचे नगरसेवक संदेश काकडे हे सुमारे अडीच हजार मताच्या फरकाच्या सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले तर सर्वात कमी प्रभाग १९ मधून भाजपचे माजी शिक्षण मंडळ सदस्य भारत पवार हे केवळ ७ मतांनी विजयी झाले. तर प्रभाग १ मधील शिवसेना उबाठाचे उमेदवार वसंत देवकर हे ११ मतांनी विजयी झाले. प्रभाग ३ मधील भाजपच्या अर्चना बारस्कर यादेखील केवळ ८  मते घेऊन विजयी झाल्या.

Post Views: 85
Previous Post

फक्त भावच नाही, तर शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढणार – सतीश घाटगे

Next Post

रानमांजराची पिल्ले पुन्हा विसावली आईच्या कुशीत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रानमांजराची पिल्ले पुन्हा विसावली आईच्या कुशीत

ताज्या बातम्या

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यात स्व. रतनचंद शहा यांच्या २० व्या पुण्यतिथी निमित्त  अभिवादन 

July 25, 2026

कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर; सोलापूर जिल्ह्यातील १,०७८ शेतकऱ्यांना दिलासा

July 25, 2026
आंबेगाव येथे चिमुकल्यांचा भक्तीसागर! जि. प. शाळा व अंगणवाडीच्या वतीने भव्य दिंडी सोहळा संपन्न

आंबेगाव येथे चिमुकल्यांचा भक्तीसागर! जि. प. शाळा व अंगणवाडीच्या वतीने भव्य दिंडी सोहळा संपन्न

July 25, 2026
आषाढी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

आषाढी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

July 25, 2026

ज्येष्ठ नागरिकांच्या स्वअर्जित मालमत्तेच्या संरक्षणाला उच्च न्यायालयाचा दुजोरा – सुनेची रिट याचिका फेटाळली

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त आमदार अभिजीत पाटील यांनी घेतले माढा येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन

आषाढी एकादशीनिमित्त आमदार अभिजीत पाटील यांनी घेतले माढा येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन

July 25, 2026

माढ्याच्या कसबा पेठ विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी

July 25, 2026
पुस्तकातून उलगडणार ॲड. पी. आर. क्षीरसागर यांचा संघर्षमय जीवनप्रवास

पुस्तकातून उलगडणार ॲड. पी. आर. क्षीरसागर यांचा संघर्षमय जीवनप्रवास

July 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0998834

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!