तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी
अंबड रब्बी हंगामासाठी पाटबंधारे विभागाकडून पैठणच्या नाथसागरातील डाव्या कालव्यात ४०० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. सोडलेले पाणी गुरुवारी दुपारी बारा वाजता वडीगोद्री येथील कालव्यात आले आहे. डाव्या कालव्यात पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. डाव्या कालव्यात पाणी आल्यावर अनेकांनी पाणी बघण्यासाठी गर्दी केली होती.
यंदा पैठण येथील नाथसागर धरण शंभर टक्के भरल्याने मराठवाड्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. डाव्या कालव्याला पाणी आल्याने जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर या तालुक्यांतील शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे. डाव्या कालव्याला पाणी येणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी शेत तयार करून ठेवले आहे. कालव्यास पाणी आल्यामुळे ऊस लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. डाव्या कालव्याला पाणी आल्याने गह, हरभरा, बाजरी व
पाण्याखाली आले असून, जालना जिल्ह्यातील कालव्यालगतच्या शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. यामुळे परिसरातील क्षेत्र सुजलाम्, सुफलाम् झाले आहे. शेतीतील उत्पन्नात वाढ झाली असून, शेती कामे वाढल्यामुळे मजुरांना रोजगार मिळाला आहे. डाव्या कालव्याला पाणी आल्यामुळे वडीगोद्री परिसरातील आंतरवाली सराटी, नालेवाडी, चंनापुरी, दह्याळा, रेणापुरी, भांबेरी, टाका, दुनगाव, रामगव्हाण, धाकलगाव, पिठोरी सिरसगाव, एकनाथनगर, सैदल गाव देदागाव गहिनीनाथनगर, शहागड, गोंदी, साष्टपिंपळगाव, आपेगाव, बळेगाव, घुंगर्डे हादगाव तसेच अंबड व घनसावंगी तालुक्यांतील गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था झाली आहे.
तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय झाली आहे. डाव्या कालव्याला पाणी आल्याने कारखाना क्षेत्रातील ऊस लागवड क्षेत्रात यंदा विक्रमी वाढ होणार आहे. पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असल्याने परिसरातील क्षेत्रात ऊस लागवड क्षेत्र वाढत आहे. ऊस लागवडीचे सगळे नियोजन शेतकऱ्यांनी करून ठेवले