अक्कलकोट – भगवंताला शरण गेला व संताचा सहवास लाभला संताचे नामस्मराण करणे भाग्य लागते .सदगुरूला शरण गेल्याशिवाय जीवाचा उध्दार होणार नाही देवानी गीता एकट्याला अर्जुनाला सांगितली . उध्दार सर्व जीवाचा केला . हरिमुखे म्हण हरिमुखे म्हणा ‘ . पुण्याची गणना कोण करी .संत म्हणून भलत्याच माणसाला शरण गेल्यास जीवनाची इति कर्तव्यता नष्ठ होते .संत म्हणून भलत्याच माणसाला शरण जाऊ नका . संताचे लक्षण जाणून घ्या .अनेक वस्तु दिसायला सारखे असायला वेगळे असतात .विस्मरण झालेले आपल्याला स्मरण करुन देणरे संत होत .जीव हाच परमात्मा आहे याच स्मरण करुन देणारे संत आहेत .. संताचे गुणगान गा’ I संताची संगत करा संताचा महिमा अगाध आहे असे प्रतिपादन ह. भ प. ज्ञानेशबुवा धानोरकर पुणे यांनी केले .
वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे समर्थाच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्य आयोजित धर्म संकीर्तन महोत्सवात ८वे पुष्प गुंफताना ह भ . प . ज्ञानेषबुवा धानोरकर पुणे . यांनी हरी कीर्तन सेवा स्वामी चरणी सादर केली .पुर्वार्धात
हभ.प ज्ञानेषबुवा धानोरकर यांनी संताचे महत्व सांगताना अनेक दृष्ठांत देताना नलदमयंती ‘ नारद कथा सांगून स्पष्ठ केले . उत्तरार्धात संत एकनाथ महाराजाची जीवन चरित्र कथा सांगुन सदगुरूची महती स्पष्ठ केली .
.प्रारंभी ह भ प .ज्ञानेशबुवा धानोरकर पुणे यांचा परिचय ओंकार पाठक यांनी करुन दिला .् ह भ . प .ज्ञानेशबुवा धानोरकर यांचा सत्कार वटवृक्षस्वामी महाराज देवस्थान मंदिर समिती वतीने मनोज जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान . चेअरमन महेश इंगळे सचिव आत्माराम घाटगे विश्वत महेश गोगी उज्वलाताई सरदेशमुख प्रथमेश इंगळे , प्रा शिवशरण अचलेर , प्रसाद पाटील , श्रीशैल गंवडी , मनोज जाधव ‘ ऋषी लोणारी ,स्वामी लोणारी : काशीनाथ इंडे , बाळासाहेब कुलकर्णी राजु भोसले ‘ महादेव तेली , लक्ष्मण पाटील , प्रसाद सोनार , अशोक कडगंची , ओंकार पाठक , अक्षय सरदेशमुख ‘ गिरिष पवार , संजय पवार ‘ रमेश शिंदे ‘ , बाळासाहेब एकबोटे रमेश शिंदे ” मनोज देगावकर अप्पा हंचाटे महादेव तेली सुनिल पवार आदि बहुसंख्य स्वामी भक्त उपस्थित होते .

























