Monday, March 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महात्मा बसवेश्वरांचे विचार व कार्य हे मानवतेला उन्नतीकडे नेणारे : कुलगुरु डॉ.महानवर

तरुण भारतbyतरुण भारत
March 9, 2026
in education
0
महात्मा बसवेश्वरांचे विचार व कार्य हे मानवतेला उन्नतीकडे नेणारे : कुलगुरु डॉ.महानवर
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – महात्मा बसवेश्वरांचे विचार व कार्य हे मानवतेला उन्नतीकडे नेणारे होते ,असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी शंकरराव मोहिते महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील हे होते.

   पुढे बोलताना ते म्हणाले की,” सुमारे ९०० वर्षांपूर्वी महात्मा बसवेश्वरांनी पुरोगामी विचार बाळगून समता प्रस्थापित करण्यासाठी क्रांतिकारी अशा स्वरूपाचे कार्य केले. समाजातील स्त्रिया व शूद्र यांना सन्मानाची वागणूक देण्याची आग्रही भूमिका घेतली . सुदृढ समाज निर्माण होण्यासाठी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून कार्य केले. त्यांचे वास्तव्य आपल्या सोलापूर जिल्ह्यातही दीर्घकाळ होते, ही आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे.त्यांचे कार्य व्यापक स्वरूपात समाजासमोर यावे, यासाठी विद्यापीठामध्ये महात्मा बसवेश्वर अध्यासन स्थापन केले आहे.”

   अध्यक्ष स्थानावरून बोलताना ,सयाजीराजे मोहिते पाटील म्हणाले की, “महात्मा बसवेश्वरांच्या महान कार्यावर आमच्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय इतिहास परिषद होत आहे, ही आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद व आनंदाची गोष्ट आहे. महात्मा बसवेश्वरांचे कार्य सर्व समाजासमोर येणे आवश्यक आहे. 

(*चौकट-कुलगुरूंनी आपल्या भाषणात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरामध्ये वृक्षारोपणासाठी उपस्थितांना रोपे दान करण्याचे आवाहन केले. तो धागा पकडून, अध्यक्ष सयाजीराजे मोहिते पाटील यांनी, वृक्षारोपणासाठी एक हजार रोपे विद्यापीठाला देण्याचे जाहीर केले*)

यावेळी व्यासपीठावर महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे संचालक चंद्रकांत गार्डी, बीजभाषक गजानन धरणे, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक वसंतराव जाधव ,रामचंद्र गायकवाड, उत्कर्ष शेटे व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य एडव्होकेट रणजीतसिंह माने देशमुख,अप्पासो मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

  इतिहास विभाग प्रमुख डॉ.दत्तात्रय मगर यांनी या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजना मागची भूमिका विशद करून बीजभाषक प्राचार्य गजानन धरणे यांचा परिचय करून दिला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांनी महाविद्यालयामध्ये होत असलेल्या उपक्रमांचा व उल्लेखनीय बाबींचा आढावा घेऊन या परिषदेसाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणाऱ्या सर्व संशोधक प्राध्यापकांना धन्यवाद दिले. 

    बीजभाषक प्राचार्य डॉ.गजानन धरणे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला. या सत्राचे अध्यक्षस्थानी डॉ.चंद्रकांत चव्हाण हे होते.

  या परिषदेच्या दुसऱ्या सत्रात सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटक (कलबुर्गी) येथून आलेले विशेष अतिथी डॉ.बी.बी.पुजारी यांनी महात्मा बसवेश्वरांच्या कानडी भाषेत असणाऱ्या विविध वचनांवर व साहित्यावर विस्तृत विवेचन केले. व महात्मा बसवेश्वरांचे कार्य हे जगभर अभ्यासले जात असून जागतिक शांततेसाठी त्यांचे विचार आजही कालसुसंगत आहेत, असे सांगितले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रभाकर कोळेकर हे होते.

   तिसऱ्या सत्रात दोन टप्प्यात विविध भागातून आलेल्या संशोधक प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले. याचे अध्यक्षस्थान डॉ .शिवाजीराव वाघमोडे व डॉ.विष्णू वाघमारे यांनी भूषवले. 

    समारोपाच्या सत्रात पुण्याहून आलेले ज्येष्ठ अभ्यासक बी.एम.पाटील यांनी बसवेश्वरांच्या कार्यावरील परिषदेचा आढावा घेऊन, ‘जीवन जगत असताना अधिक गंभीर न होता खिलाडू वृत्तीने व हसत खेळत जगणे आवश्यक आहे’, असे सांगितले.

या परिषदेत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ .चंद्रकांत चव्हाण, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अध्यासनाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. विष्णू वाघमारे. डॉ. शिवाजीराव वाघमोडे. डॉ राजेंद्र गायकवाड, आदींनी आपले विचार व्यक्त केले.

ही राष्ट्रीय इतिहास परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ. विश्वनाथ आवड ,

डॉ.एच.के.आवताडे, डॉ.बाळासाहेब मुळीक व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

    प्रा.डॉ.सज्जन पवार यांनी आभार मानले तर, विनायक प्रा. सूर्यवंशी व डॉ. संजय वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

Post Views: 17
Previous Post

भारताने मॅच जिंकताच अकलूज मध्ये जल्लोष

Next Post

महिला दिनानिमित्त मुक्ताई मंदिरात महिला मेळावा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महिला दिनानिमित्त मुक्ताई मंदिरात महिला मेळावा

महिला दिनानिमित्त मुक्ताई मंदिरात महिला मेळावा

ताज्या बातम्या

दलित मित्र भीमराव जाधव प्रशालेत मुलांनी घेतले नैसर्गिक रंगांचे प्रशिक्षण #public #marathinews

March 9, 2026

ममता वर नाराज झाल्या … राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु. #public #marathinews #viral

March 9, 2026
स्मार्ट मीटर व वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

स्मार्ट मीटर व वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

March 9, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

March 9, 2026
महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड

महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड

March 9, 2026
श्रमिक पत्रकार संघ आणि दयावान बहुउद्देशीय संस्थेतर्फे पर्यावरण पूरक रंगोत्सव

श्रमिक पत्रकार संघ आणि दयावान बहुउद्देशीय संस्थेतर्फे पर्यावरण पूरक रंगोत्सव

March 9, 2026
महिला दिनानिमित्त सांगोल्यातील आपुलकीकडून गरजू महिलांना उपजीविकेच्या वस्तूंचे वाटप

महिला दिनानिमित्त सांगोल्यातील आपुलकीकडून गरजू महिलांना उपजीविकेच्या वस्तूंचे वाटप

March 9, 2026
काहींना कुटुंब हाच पक्ष वाटतो तर शिंदे साहेबांना कार्यकर्ता हेच कुटुंब वाटतं : प्रा. डॉ. ज्योती वाघमारे 

काहींना कुटुंब हाच पक्ष वाटतो तर शिंदे साहेबांना कार्यकर्ता हेच कुटुंब वाटतं : प्रा. डॉ. ज्योती वाघमारे 

March 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0720856

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697