सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन आणि कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या विशेष व्याख्यानाचे उदघाटन मा. डॉ. लक्ष्मिकांत दामा ( प्र. कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर)यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
प्र. कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा यांनी आपल्या भाषणात बसवेश्वरांच्या जीवनकार्याचा वेध घेतला. १२ व्या शतकात होऊन गेलेल्या बसवेश्वरांनी समाजातील जातीव्यवस्था आणि वर्णभेद नाकारून स्त्री-पुरुष समानतेचा अधिकार दिला. त्यांनी स्त्रियांना ‘अनुभव मंटप’मध्ये प्रवेश देऊन अक्कमहादेवी, लिंगम्मा आणि रायम्मा यांसारख्या कर्तृत्ववान महिलांना साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहित केले, ज्यांनी स्वतःचा ठसा उमठवला असे प्रतिपादन केले.
प्रमुख व्याख्याते डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी ‘महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची समकालीन प्रासंगिकता’ या विषयावर विशेष व्याख्यान बोलतांना असे म्हणाले की, बसवेश्वरांनी केवळ मंदिरे बांधण्यापेक्षा ‘आपले शरीर हेच देवालय’ हा विचार मांडला. त्यांनी मूर्तीपूजा, कर्मकांड आणि पुरोहितशाहीला कडाडून विरोध केला. वेदांचे प्रामाण्य नाकारून त्यांनी पशुहिंसेला विरोध केला. इष्टलिंगाची पूजा स्वतःची स्वतः करावी, असा सोपा आणि सुटसुटीत मार्ग त्यांनी सामान्य लोकांसाठी खुला केला.
या व्याख्यान सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. प्रितम कोठारी यांनी काम पहिले.या उदघाटन सत्राच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.अश्विन बोन्दार्डे होते. याप्रसंगी महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे संचालक प्रा. चंद्रकांत गार्डी, विद्यापीठाच्या महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे सल्लागार समितीचे डॉ. प्राचार्य डॉ. गजाजन धरणे, श्री.रोहित पावले, महादेव न्हावकर हे उपस्थित हिते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. विद्या भोसले यांनी केले.आभारप्रदर्शन डॉ. दत्ता वाघमारे यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन कु. कांचन मरीकंटी यांनी केले.या विशेष व्याख्यानास विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक,विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


















