सोलापूरच्या कासेगाव मधील ओढ्याच्या पुरात तिघे गेले वाहून ; दोघे वाचले एकाचा पत्ता लागेना
दक्षिण सोलापूर तालुक्यात देखील मागील पाच दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पूलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले तिघे जण पुराच्या पाण्या बरोबर वाहून गेले असल्याचे माहिती मिळतेय.
ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्या पैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्या बरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचविण्यात यश आले तर ज्ञानेश्वर कदम सकाळ पर्यंत मिळून आला नसल्याचा ग्रामस्थांमध्ये बोललं जातंय.
बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांनी ग्रामस्थांना दिलेल्या माहितीवरून रात्री तिघे ट्रिपल शीट टू व्हीलर वरून गावाकडे येत असताना पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने प्रवाहा मध्ये दुचाकीसह तिघेही वाहून गेले.
त्यातील आम्ही दोघे बचावलो अद्याप ज्ञानेश्वर कदम यांचे काय झालं हे माहीत नसल्याची माहिती जाधव आणि रेड्डी यांनी दिली. स्थानिक प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला याविषयी माहिती देऊन कदम यांचा शोध घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
तालुक्याचे तहसीलदार अमोल जमदाडे, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन वाहून गेलेल्या कदम यांचा शोध घ्यावा आणि कासेगाव मधील हा खड्ड्यात गेलेला ओढ्याचा पूल याची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.