मुंबई : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने अॅडवाण्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६ मध्ये सहभाग घेतला, जेथे महाराष्ट्रातील कौशल्य विकास उपक्रमांच्या माध्यमातून शाश्वत गतीशीलता, जबाबदार उत्पादन आणि तरूणांचे सक्षमीकरण करण्याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. या एक्स्पोमध्ये सहभाग घेण्यासह टोयोटा फ्लेक्स-फ्यूएल स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल (एसएचईव्ही) तंत्रज्ञानाच्या क्षमतेला प्रकाशझोतात आणत आहे. एक्स्पोमधील पॅव्हिलियनमधून उद्योग सहयोग आणि तंत्रज्ञानाबाबत जागरूकतेप्रती टीकेएमचा केंद्रित दृष्टिकोन देखील दिसून आला, जो भारताच्या ऊर्जा परिवर्तन ध्येयांशी संलग्न आहे.
अॅडवाण्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६ छत्रपती संभाजीनगर व मराठवाडा प्रांतामधील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन आहे, जे दर तीन वर्षांनी एकदा आयोजित केले जाते. आघाडीची उद्योग संस्था एमएएसएसआयए (मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल-स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर) महाराष्ट्र सरकारसोबत सहयोगाने या प्रदर्शनाचे आयोजन करते.
टेक्नॉलॉजी पॅव्हिलियनमध्ये टीकेएमने हायक्रॉस फ्लेक्झी-फ्यूएल स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल (एफएफव्ही एसएचईव्ही)सह प्रगत वेईकल तंत्रज्ञानांच्या उत्कृष्ट प्रदर्शनाला सादर केले. यासह टीकेएमचा दृष्टिकोन दिसून आला, ज्यामधून शाश्वत गतीशीलतेमध्ये संतुलन राखणारे कार्बन न्यूट्रॅलिटी संपादित करण्याप्रती बहु-मार्गीय दृष्टिकोनावर केंद्रित तत्त्व दिसून येते.
या एक्स्पोमधील आपला सहभाग अधिक दृढ करत टीकेएमने उद्योग व शैक्षणिक संस्थांमधील प्रतिनिधींसाठी टोयोटा कल्चरवर सत्राचे आयोजन केले. या सत्रामध्ये दर्जा-केंद्रित उत्पादन, सतत सुधारणा, कौशल्य विकास आणि ग्राहक केंद्रित नेतृत्व या टीकेएमच्या मुलभूत मूल्यांना दाखवण्यात आले, ज्यांचा महाराष्ट्रातील दीर्घकालीन सहयोग अधिक प्रबळ करण्याचा मनसुबा आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे चीफ कम्युनिकेशन ऑफिसर, वरिष्ठ उपाध्यक्ष व संचालक श्री. सुदीप दळवी म्हणाले, ”टोयोटा किर्लोस्कर मोटर महाराष्ट्र सरकारचे राज्यातील आमच्या ग्रीनफिल्ड उत्पादन प्रकल्पाला सतत पाठिंबा देण्यासाठी आभार व्यक्त करते. आमची आगामी सुविधा राज्यातील टीकेएमच्या ऑपरेशनल उपस्थितीला अधिक वाढवेल, जेथे स्थानिकीकरणावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्यात येईल. तसेच स्थानिक विकासासाठी अधिक संधी निर्माण करण्यात येतील. अॅडवाण्टेज महाराष्ट्र एक्स्पोमधील सहभागामधून प्रांतामध्ये सुरू असलेले सहयोगात्मक उपक्रम दिसून येतात, तसेच महाराष्ट्रामध्ये शाश्वत विकास, नाविन्यता आणि सामुदायिक सक्षमीकरणाला चालना देण्याप्रती आमची कटिबद्धता देखील दिसून येते. टीकेएमने आपल्या संरचित कौशल्य विकास व सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सतत मुलभूत क्षमता निर्माण करण्यावर आणि शैक्षणिक परिसंस्था प्रबळ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या प्रयत्नांना पूरक म्हणून आम्ही तंत्रज्ञान उपक्रम प्रगत करत राहू, जे शुद्ध गतीशीलता आणि अधिक कार्यक्षम पॉवरट्रेन यंत्रणांना पाठिंबा देतील.”
टोयोटा किर्लोस्कर मोटरने नुकतेच महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, ज्यासह राज्यामध्ये संरचित व मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास परिसंस्थेच्या विकासाला साह्य करण्यासाठी सरकारसोबत सहयोग अधिक दृढ केला आहे. याव्यतिरिक्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच, शिक्षणावरील आपल्या सीएसआर फोकसचा भाग म्हणून टीकेएमने छत्रपती संभाजीनगरमधील ११ सरकारी शाळांमध्ये पायाभूत सुविधा व शैक्षणिक सुविधा अपग्रेड केल्या आहेत आणि स्थानिक समुदायांसाठी शैक्षणिक वातावरणांना सुधारण्याप्रती योगदान देत आहे.


















